मराठी अभिनेता सुबोध भावे हा कायमच चर्चेत असतो. सुबोधने मराठी चित्रपट, मालिका यांमध्ये त्याच्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवला आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्याला ओळखले जाते. नुकतंच अवधूत गुप्तेने त्याच्या स्वभावाबद्दल एक किस्सा सांगितला.

सुबोध भावेने नुकतंच अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्यासह सिनेसृष्टीबद्दलही भाष्य केले. यावेळी अवधूतने त्याला एक प्रश्न विचारला. घरातून बाहेर पडताना चार चार वेळा कुलूप लावलंय की नाही असं तपासणारे लोक असतात. असे काही खुपणारे गुण सुबोधमध्येही आहेत का? असे अवधूत गुप्ते म्हणाला.
आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?
Suresh Dhas and ajit pawar
Suresh Dhas : “अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…”, सुरेश धसांनी परभणीची सभा गाजवली; ‘बिनमंत्र्यांचा जिल्हा’ ठेवण्याची मागणी!
sajid khan on me too allegation on him
“सहा वर्षांत अनेक वेळा स्वतःला संपवण्याचा…”, MeToo प्रकरणात आरोप झालेल्या बॉलीवूड दिग्दर्शकाने केला खुलासा; म्हणाला…
Pandurang Ulape Kolhapur
“..आणि मृत घोषित करण्यात आलेले आजोबा जिवंत झाले”, कोल्हापुरात घडली अविश्वसनीय घटना

त्यावर सुबोध म्हणाला, “माझा माझ्यावर विश्वास नाही. घरातलं सोडं मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा थिएटर अकादमीतील मुलांनी एकत्र येऊन एक ग्रुप चालू केला होता. त्याद्वारे आम्ही विविध नाटकाच्या तालीम करायचो. अकादमीच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर मी घरी यायचो.”

“माझं घर, अकादमीचं ऑफिस या दरम्यान माझा एक मित्र राहायचा. मी दररोज रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान त्याला उठवायचो. त्याला सांगायचो की, ‘आताच्या आता जा आणि अकादमीच्या ऑफिसचं कुलूप लावलंय की नाही ते बघून ये.’

तेव्हा तो म्हणायचा, ‘अरे आपण सर्वजण एकत्र बाहेर पडलो, तू कुलूप लावलं आहेस.’ ‘तरीही मी त्याला नाही तू आताच जा आणि कुलूप नीट लावलं की नाही ते ओढून बघ. मी दररोज हे करायचो'”, असा किस्सा सुबोधने यावेळी सांगितला.

आणखी वाचा : “मी खंबीररित्या जगू शकत नाही…”, ‘पुष्पा’ फेम अभिनेत्रीने ढसाढसा रडत मांडली व्यथा, म्हणाली “एक सेलिब्रेटी असल्याने…”

दरम्यान ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात सुबोध भावेने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. यावेळी दादासाहेब फाळके यांच्याशी बोलताना त्याने भावनिक साद घातली. “दादासाहेब ही सिनेसृष्टी जिवंत राहण्यासाठी त्याचा व्यवसाय म्हणून विचार करणं आणि त्या दृष्टीने पावलं टाकणं गरजेचे आहे”, असे सुबोध भावेने म्हटले.

Story img Loader