‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेमुळे नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे सुमीत पुसावळे. सुमीतने १४ डिसेंबर रोजी (बुधवारी) लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. सुमीत मोनिका महाजनसह विवाहबंधनात अडकला आहे. सुमीतच्या लग्नाचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा – Pathan Controversy : दीपिका पदुकोणची ‘बेशरम रंग’मधील भगवी बिकिनी वादाच्या केंद्रस्थानी; पण या बिकिनीचा डिझायनर कोण?

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट

सोलापूरमध्ये सुमीतचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. यावेळी कलाक्षेत्रातील काही मंडळींनीही हजेरी लावली होती. सुमीत व मोनिका पारंपारिक लूकमध्ये अगदी सुंदर दिसत होते. सुमीतने यावेळी भरमंडपात पत्नीसाठी खास उखाणा घेतला.

पाहा व्हिडीओ

सुमीत उखाणा घेत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “गल्लीमध्ये खेळत होतो क्रिकेट तिकडून आली मोनिका आणि पडली माझी विकेट.” असा उखाणा सुमीत घेताना दिसत आहे.

आणखी वाचा – “५२ सर्जरी, माझं कुटुंब उद्धवस्त झालं…” दिल्लीत शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्यानंतर कंगना रणौतचा धक्कादायक खुलासा

तसेच उखाणा घेत असताना तो अगदी लाजतो. तर मोनिका हसत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सुमीतने या व्हिडीओमध्ये डिझायनर शेरवानी परिधान केली असल्याचं दिसत आहे. तर मोनिकाने डिझायनर लेहंगा परिधान केला आहे. या जोडप्याला नेटकरीही पसंती दर्शवताना दिसत आहेत.

Story img Loader