‘का रे दुरावा’, ‘दुर्वा’, ‘पुढचं पाऊल’ या मालिकांतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे सुयश टिळक. सध्या तो ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता अभिनेत्याने एका मुलाखतीत त्याच्या आई-वडिलांची लव्ह स्टोरी प्रेरणादायी असल्याचे म्हणत त्याचे कारणही सांगितले आहे.

काय म्हणाला अभिनेता?

अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak)ने नुकतीच ‘गोळाबेरीज’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने अभिनय क्षेत्र, नाटक,ज्या मालिकांत काम केले त्याचे काही अनुभव, फोटोग्राफी अशा अनेकविध गोष्टींवर वक्तव्य केले आहे. त्याबरोबरच त्याने त्याच्या आई-वडिलांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलताना म्हटले, “माझ्या आई-वडिलांची लव्ह स्टोरी माझ्यासाठी प्रेरणादायी एवढ्यासाठी आहे; कारण- त्यांनी ज्या काळात लव्ह मॅरेज करायचा निर्णय घेतला, त्यावेळी लव्ह मॅरेजला तितकंसं स्वीकारलं जात नसे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या मतानुसार तो निर्णय घ्यायचा ठरवलं म्हणजे पळून जाऊन लग्न करू वगैरे या झोनला ते गेले नाहीत. कुटुंबाची रीतसर परवानगी घेऊन, स्वत:ला सिद्ध करून दाखवणं वगैरे अशी थोडीशी फिल्मिगिरी होती ती.”

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”

“या लव्ह स्टोरीमध्ये सगळ्यात जास्त प्रेरणा देणारी गोष्ट अशी आहे की, माझे आई-बाबा स्वभावाने फार वेगवेगळे आहेत. आईचा स्वभाव फार वेगळा आहे. बाबांचाही स्वभाव फार वेगळा आहे. अजूनही मला वाटतं की, बऱ्याच घरांमध्ये तसे असतात. पण, त्या दोघांनी आयुष्यात एकमेकांसाठी निरपेक्षपणे इतक्या अ‍ॅडजस्टमेंट केल्या आहेत. त्यांनी कुटुंबाला खूप प्राधान्य दिलं आहे. म्हणजे आजही आम्हाला दोघांना म्हणजे मला व माझ्या बहिणीला हेच शिकवलं जातं की, कुटुंब खूप महत्त्वाचं आहे.”

“काही झालं तरी म्हणजे कदाचित तुमच्या कुटुंबानं तुम्हाला पाठिंबा दिला नसेल किंवा तुमच्या निर्णयांचं कौतुक केलं नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कुटुंबाला तोडणं हे बरोबर नाही. हे त्या दोघांकडे बघून आम्ही शिकतोय. मी आजही शिकतोय. त्या दोघांनी ज्या पद्धतीनं कुटुंबाला प्रेम दिलंय, तेवढाच आदर दिलेला आहे. जरी जेव्हा ते लग्न करत होते, तेव्हा कुटुंबाला शंका होती तरीसुद्धा त्यांच्या तोंडून कुटुंबातील कुठल्याच व्यक्तीबद्दल कधीच एकही अपशब्द येत नाही. नेहमी आदर आणि प्रेम येतं.”

“त्यामुळे ती प्रेरणादायी गोष्ट एवढ्यासाठी आहे की, आजकाल आपण फार पटकन स्वार्थी होतो. मला जे हवंय ते नसेल होत, तर मी समोरच्याला जज करून मोकळा होतो, पुढे जातो. त्या दोघांनी ते केलं नाहीये आणि अजूनही ते करत नाहीत. ते एकमेकांना धरून तर आहेतच; पण कुटुंबालासुद्धा धरून आहेत.”

“त्यांची लव्ह स्टोरी फार गोड आहे. म्हणजे आईला जेव्हा बाबांनी मागणी घातली होती, त्या वेळेला तिचं फार क्लीअर उत्तर होतं की, तू माझ्या घरी येऊन घरच्यांना भेट. बाबांनीसुद्धा घरच्यांना सामोरं जाण्याचं धैर्य दाखवून मी माझ्या बळावर हिला सुखी ठेवीन, जसं जमेल तसं सुखी ठेवीन. तो प्रयत्न करीन. ही हिंमत तेव्हा दाखवणं, त्यांच्या वयात फारच रिस्की होतं. म्हणजे अगदी दहा बाय दहाच्या रूममध्ये राहून त्यांनी संसार केला. आईने फार श्रीमंती बघितली होती आणि तिला अचानक बसमध्ये प्रवास करायला लागणं किंवा अशा रूम्समध्ये राहायला लागणं, या गोष्टी कराव्या लागल्या. कारण- बाबा स्वत:च्या करिअरसाठी घरापासून वेगळे झाले होते. त्यामुळे त्यांनी तो सगळा संघर्ष बघितलेला आहे आणि त्या संघर्षातसुद्धा एकमेकांना न सोडता एकमेकांना पूर्णपणे सांभाळून घेत, स्वत:चं असं एक वेगळं जग उभं केलं आहे, ते सगळं खूप प्रभावित करणारं आहे”, असे म्हणत सुयशने त्याच्या आई-वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: ‘एखादा सिनेमा गेला त्याची खंत नाही का?’ नाना पाटेकर म्हणाले, “खूप रोल गेले त्यात माझा…”

दरम्यान, सुयश टिळक सध्या त्याच्या नवीन नाटकामुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Story img Loader