‘का रे दुरावा’, ‘दुर्वा’, ‘पुढचं पाऊल’ या मालिकांतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सुयश टिळक( Suyash Tilak) हा आहे. सध्या तो ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता अभिनेत्याने एका मुलाखतीत त्याच्या आई-वडिलांची लव्ह स्टोरी प्रेरणादायी असल्याचे म्हणत त्याचे कारणही सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाला अभिनेता?

अभिनेता सुयश टिळकने नुकतीच ‘गोळाबेरीज’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने अभिनय क्षेत्र, नाटक,ज्या मालिकांत काम केले त्याचे काही अनुभव, फोटोग्राफी अशा अनेकविध गोष्टींवर वक्तव्य केले आहे. याबरोबरच, त्याने त्याच्या आई-वडिलांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलताना म्हटले, “माझ्या आई-वडिलांची लव्ह स्टोरी माझ्यासाठी प्रेरणादायी एवढ्यासाठी आहे,कारण- त्यांनी ज्या काळात लव्ह मॅरेज करायचा निर्णय घेतला, त्यावेळी लव्ह मॅरेजला तितकं स्विकारलं जात नसे. तो त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या मतानी तो निर्णय घ्यायचा ठरवलं म्हणजे पळून जाऊन लग्न करू वैगेरे या झोनला ते गेले नाहीत. कुटुंबाची रीतसर परवानगी घेऊन, स्वत:ला सिद्ध करून दाखवणं वैगेरे असं थोडीशी फिल्मीगिरी होती.”

“या लव्ह स्टोरीमध्ये सगळ्यात जास्त प्रेरणा देणारी गोष्ट अशी आहे की माझे आई-बाबा स्वभावाने फार वेगवेगळे आहेत. आईचा स्वभाव फार वेगळा आहे. बाबांचा स्वभाव फार वेगळा आहे. अजून मला वाटतं बऱ्याच घरांमध्ये असतात. पण, त्या दोघांनी आयुष्यात एकमेकांसाठी निरपेक्षपणे इतक्या अॅडजस्टमेंट केल्या आहेत. त्यांनी कुटुंबाला खूप प्राधान्य दिलं आहे. म्हणजे आजही आम्हाला दोघांना म्हणजे मला व माझ्या बहिणीला हेच शिकवलं जातं की कुटुंब खूप महत्वाचं आहे.”

“काही झालं तरी म्हणजे कदाचित तुमच्या कुटुंबाने तुम्हाला पाठिंबा दिला नसेल किंवा तुमचे निर्णयांचे कौतुक केले नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कुटुंबाला तोडणं हे बरोबर नाही.हे त्या दोघांकडे बघून आम्ही शिकतोय. मी आजही शिकतोय. त्या दोघांनी ज्या पद्धतीने कुटुंबाला प्रेम दिलंय, तेवढाच आदर दिलेला आहे. जरी जेव्हा ते लग्न करत होते, तेव्हा कुटुंबाला शंका होती तरीसुद्धा त्यांच्या तोंडून कुटुंबातील कुठल्याच व्यक्तीबद्दल कधीच एकही अपशब्द येत नाही.नेहमी आदर आणि प्रेम येतं.”

“त्यामुळे ती प्रेरणादायी गोष्ट एवढ्यासाठी आहे की आजकाल आपण फार पटकन स्वार्थी होतो. मला जे हवंय ते नसेल होत तर मी समोरच्याला जज करून मोकळा होतो, पुढे जातो. त्या दोघांनी ते केलं नाहीये आणि अजूनही ते करत नाहीत. ते एकमेकांना धरून तर आहेतच पण कुटुंबालासुद्धा धरून आहेत.”

“फार गोड त्यांची लव्ह स्टोरी आहे. म्हणजे आईला जेव्हा बाबांनी मागणी घातली होती, त्यावेळेला तिचं फार क्लिअर उत्तर होतं की तू माझ्या घरी येऊन घरच्यांना भेट. बाबांनीसुद्धा घरच्यांना सामोरं जाण्याचं धैर्य दाखवून मी माझ्या बळावर हिला सुखी ठेवीन, जसं जमेल तसं सुखी ठेवीन. तो प्रयत्न करीन. ही हिंमत तेव्हा दाखवणं, त्यांच्या वयात फारच रिस्की होतं. म्हणजे अगदी दहा बाय दहाच्या रूममध्ये राहण्याचा संसार त्यांनी केला. आईने फार श्रीमंती बघितली होती आणि तिला अचानक बसमध्ये प्रवास करायला लागणं किंवा अशा रूम्समध्ये राहायला लागणं, या गोष्टी कराव्या लागल्या. कारण बाबा स्वत:च्या करिअरसाठी घरापासून वेगळे झाले होते. त्यामुळे त्यांनी तो सगळा संघर्ष बघितलेला आहे आणि त्या संघर्षातसुद्धा एकमेकांना न सोडता एकमेकांना पूर्ण करत स्वत:चं एक वेगळं जग उभं केलं आहे, ते सगळं खूप प्रभावित करणारं आहे”, असे म्हणत सुयशने त्याच्या आई-वडिलांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: ‘एखादा सिनेमा गेला त्याची खंत नाही का?’ नाना पाटेकर म्हणाले, “खूप रोल गेले त्यात माझा…”

दरम्यान, सुयश टिळक सध्या त्याच्या नवीन नाटकामुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.