मराठी मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत सुयश टिळकने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सुयशने त्याच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ‘का रे दुरावा’, ‘दुर्वा’, ‘पुढचं पाऊल’, ‘बंध रेशमाचे’ यांसारख्या मालिकांमधील त्याच्या भूमिका प्रचंड गाजल्या. सध्या तो ‘मी स्वरा आणि ती दोघं’ या नाटकात काम करत आहे. नुकतंच त्याने एका पुरस्कार सोहळ्याचा किस्सा सांगितला आहे.
सुयश टिळकने नुकतंच ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्याने पुरस्कार सोहळ्यात घडलेला किस्सा सांगितला. “एका पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ कलाकारांना बसायला खुर्च्या नव्हत्या. पण इन्फ्लुएन्सरची चांगली सोय करण्यात आली होती”, असा किस्सा त्याने सांगितला आहे.
आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”
“काही महिन्यांपूर्वी मी एका पुरस्कार सोहळ्यात गेलो होतो. मला त्या पुरस्कार सोहळ्याला नॉमिनेशन नव्हते. मी सहजच गेलो होतो. तिथे गेल्यावर मी जास्त वेळ थांबणार नाही, असं ठरवलं होतं. मी तिथे गेल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात ती म्हणजे ज्यांना तिथे पुरस्कारासाठी नॉमिनेशन होतं, त्यांनाही आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. पण काही इन्फ्लुअनर्सला बोलवलं होतं. त्यांच्या नावाच्या पाट्या होत्या”, असा एक किस्सा सुयश टिळकने शेअर केला.
“त्याबरोबरच आणखी एका पुरस्कार सोहळ्याला काही खूप ज्येष्ठ कलाकार जे गेल्या ४०-५० वर्ष सिनेसृष्टीत काम करतात, त्यांच्या नावाच्या पाट्या असलेल्या खुर्च्या नव्हत्या. पण जे नवीन तरुण इन्फ्लुनर्स आहेत, जे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत, त्यांना बोलवण्यात आलं होतं. त्यांच्या नावाच्या पहिल्या रांगेत खुर्च्याही होत्या.
आपल्याकडे ज्येष्ठ कलाकार मंडळी ही खूप समजुतदार आहेत. यातील काहींनी अजिबात प्रतिक्रिया दिली नाही. काहीजण जिथे जागा मिळेल तिथे बसत होते. मला ते पाहून इतकं वाईट वाटलं”, असे तो म्हणाला.
आणखी वाचा : “आम्हा दोघांना…” अक्षया देवधरबरोबर झालेल्या साखरपुड्याच्या अफवांवर सुयश टिळकची पहिली प्रतिक्रिया
“यादरम्यान एक ज्येष्ठ अभिनेत्री या चिडल्या. त्यांना पुरस्कार सोहळ्याला खुर्चीच मिळाली नाही. त्यावेळी मी त्यांना माझी खुर्ची दिली आणि सांगितलं की तुम्ही इथे बसा. मी जातो आहे. त्यानंतर मी त्या पुरस्कार सोहळ्यावरुन १५ मिनिटात निघालो. जे कलाकार इतकी वर्ष काम करतात. ते आपलं मनोरंजन करतात. मला ते सर्व पाहून फार वाईट वाटले”, असेही त्याने सांगितले.