‘बिग बॉस १६’च्या घरात मराठमोळ्या शिव ठाकरेची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसली. शिव ठाकरे हा बिग बॉसच्या ट्रॉफीपासून अवघं एक पाऊल दूर राहिला. त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पण शिव ठाकरेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं. बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारही शिव ठाकरेचे कौतुक करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेता स्वप्निल जोशी हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच स्वप्निल जोशीने ट्वीटरवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतले. यावेळी स्वप्निल जोशीला शिव ठाकरेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्ट भाषेत उत्तर दिले.
आणखी वाचा : “एमसी स्टॅनने माझी माफी मागितली कारण…” शिव ठाकरेचा खुलासा

“तुम्ही फार मनापासून शिव ठाकरेला पाठिंबा दिला होता. तो त्याला पात्र होता. तुम्हीदेखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहात”, असे एकाने यावेळी म्हटले.

त्याला उत्तर देताना स्वप्निल जोशी म्हणाला, “शिव हा मला भावासारखा आहे. त्याला साथ द्यावी असं मला मनापासून वाटले. माझ्यासाठी तो विजेता आहे.” स्वप्निलचे हे उत्तर ऐकून चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा : “तू खोटारडा आहेस…” वीणा जगतापचे शिव ठाकरेबद्दल स्पष्ट वक्तव्य

दरम्यान बिग बॉस १६ च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये एमसी स्टेन, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोट होते. या पाच जणांमध्ये एमसी स्टॅनला सर्वाधिक मतांनी विजयी ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी, ३१ लाख आणि गाडी देण्यात आली.