Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२३-२४ साठीचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार आहे, अशी माहिती दिली. त्याबरोबर या अर्थसंकल्पात कर्ज, करात सवलत, शेतकरी, व्यावसायिक, महागाई अशा महत्वाच्या क्षेत्रांविषयी घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नुकतंच मराठी अभिनेता स्वप्निल जोशी याने याबद्दल ट्वीट केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी केंद्र सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमधील कपात ही सर्वात मोठी घोषणा आहे. केंद्र सरकारने टॅक्सची जुनी व्यवस्था आता बंद केली आहे. यात सोने, चांदी आणि प्लॅटिनम आता महागणार आहे. तसेच सिगारेट देखील महागणार आहे. कारण सिगारेटवरील कस्टम ड्युटी वाढून आता १६ टक्के इतकी झाली आहे. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्यांना सिगारेटसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. देशी किचन चिमणी देखील महागणार आहे.
आणखी वाचा : Union Budget 2023 Live Updates: अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय? देवेंद्र फडणवीस म्हणतात…!

Amol Kolhe on Devendra Fadnavis
Amol Kolhe: “…याचा अर्थ महायुतीचे सरकारच येणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत अमोल कोल्हेंची सूचक टिप्पणी!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
CM Siddaramaiah, CM Siddaramaiah Solapur,
मोदींची सत्ता गेल्यावरच देशात ‘अच्छे दिन’ – सिद्धरामय्या
bjp slogans batenge to katenge ek hai to safe hai in maharashtra assembly elections
अग्रलेख : घोषणांच्या म्हशी…
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान

त्याबरोबर मोबाईल फोन आणि कॅमेरा लेन्स स्वस्त होणार आहे. एलईडी टीव्ही आणि बायोगॅसशी संबंधित उपकरणं स्वस्त होतील. अलिकडेच टीव्हीच्या भागांवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कार, खेळणी आणि सायकल स्वस्त होणार आहे.

संसदेत २०२३-२४ साठीचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता यावर अभिनेता स्वप्निल जोशीने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्याने “….आज सगळेच experts आहेत !” #Budget असे ट्वीट केले आहे. त्याच्या या ट्वीटनंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा : Budget 2023 : सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वाची घोषणा

स्वप्निल जोशीच्या या ट्वीटवर अनेकजण प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यातले “किमान 90 टक्के आयकर भरत नसतील…” अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे. तर एकाने “हो भाऊ जसा तू चला हवा येऊ द्या शो मध्ये” असे त्याला म्हटले आहे.