Swapnil Rajshekhar : मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणून स्वप्नील राजशेखर यांना ओळखलं जातं. सध्या ते ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अधिपतीचे वडील म्हणजेच चारुहास हे पात्र साकारत आहेत. स्वप्नील हे मराठी सिनेइंडस्ट्रीतले दिवंगत अभिनेते राजशेखर यांचे चिरंजीव आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवंगत अभिनेते राजशेखर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. हे ज्येष्ठ अभिनेते पडद्यामागे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपताना दिसले. आज त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचे चिरंजीव स्वप्नील राजशेखर पुढे चालवत आहेत. राजशेखर यांचं २५ डिसेंबर २००५ रोजी निधन झालं. आज त्यांना जाऊन १९ वर्षे झाली आहेत. वडिलांच्या आठवणीत भावुक होत स्वप्नील यांनी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : “इंडस्ट्रीतल्या वर्चस्ववाद्यांनी माझ्या पोटावर मारलेली लाथ….”, निळू फुलेंच्या नावाने पहिला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले…

स्वप्नील राजशेखर यांची पोस्ट

आज एकोणीस वर्षे झाली आमचा सांता जाऊन…

काळ सरत राहिला, वर्ष उलटत राहिली… आयुष्य पुढे सरकत राहिलं… सुखदुःख येत राहिली.
पण, २५ डिसेंबर २००५ च्या सकाळी पोटात आणि आयुष्यात पडलेला खड्डा आजही तसाच आहे..
तो भरला नाही, भरणारही नाही कधी…

‘डोक्यावरचं आभाळ फाटलं, पाया खालची जमीन निसटली, पोकळी निर्माण झाली’ या आणि अशा पुस्तकी उपमा किती थिट्या आहेत हे क्षणोक्षणी जाणवावं असं फिलींग आहे, आपला बाप या जगात नसण्याचं…

गेली १९ वर्षे सतत एक विचार मन पोखरत रहातो की…
पप्पा होते तेव्हा किती संधी होती माझ्याकडे त्यांना भरभरून भेटायची, बोलायची, त्यांना स्वतःमध्ये साठवून घेण्याची… आणि तेव्हा किती निरर्थक, निरुपयोगी आणि भंगार गोष्टीत वेळ घालवला असेल मी… पप्पा हयात असताना त्यांना वेळ न देता…

उद्या कधी टाईम ट्रॅव्हल शक्य झालं, तर मी त्यांचं जाणं थांबवणार नाही कदाचित, पण त्याआधीचा मॅक्सिमम काळ पप्पांबरोबर घालवेन… त्यांचा स्पर्श आणखी आणखी साठवेन स्मृतीत…
तो उबदार आश्वासक स्पर्श…

“मी आहे रे.. तू जिंकलास, हरलास, पडलास, चुकलास, माती खाल्लीस, रडलास,.. सगळ्यात मी आहे तुझ्याबरोबर” हे सांगणारा…

पण च्यायला.. ही सगळी पश्चात बुध्दी आहे…
एरव्ही माणसाचं असणं गृहीतच धरतो आपण…

असो.. पप्पा तसे माझ्याबरोबरच आहेत म्हणा…
गरजेच्या वेळी डोळे मिटून हात पुढे केला की, त्यांचा स्पर्श हातात शब्दशः जाणवतो.
सुदैवाने तेवढी पोतडी भरलेलीय आपली…

बाकी तो चलता है… दुनिया है…

पण १९ वर्षांमध्ये एक झालंय, कोणाचेही आईवडील गेल्याचं कळलं, की माझ्याही आतमध्ये तुटतं काहीतरी… त्याच्याबद्दल कणव दाटून येते.

हल्लीच एका सुहृदयाचे वडील गेले..
मी ठरवून बऱ्याच दिवसांनी भेटलो त्याला..
बाकी काही बोलण्यासारखं नव्हतंच..
मी त्याच्या पाठीवर हात ठेवून
“welcome to the club” म्हणालो…

तो खोल बघत राहिला माझ्याकडे…

हेही वाचा : ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ची फी किती? आकडा ऐकून थक्क व्हाल! ऐश्वर्या रायची लेक, शाहरुखचा मुलगा आहे या शाळेचा विद्यार्थी

दरम्यान, स्वप्नील राजशेखर यांच्या पोस्टवर कमेंट्स करत दिवंगत अभिनेते राजशेखर यांच्याबद्दल अनेक आठवणी चाहत्यांनी देखील सांगितल्या आहेत. “खलनायकाची भूमिका उत्तमप्रकारे करणारा एक चांगला कलाकार म्हणून ओळख असलेला आपल्या कोल्हापूरचा ढाण्या वाघ”, “किती छान आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत… माणूस असेपर्यंत आपण कायम गृहीतच धरतो.” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.