उदय टिकेकर मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर उदय टिकेकर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान, त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी शेअर केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

उदय टिकेकर यांनी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. आज आरती अंकलीकर यांचा वाढदिवस आहे. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. उदय टिकेकर यांनी पत्नीबरोबरचा एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये ते आपल्या पत्नीच्या गालावर किस करताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करीत त्यांनी लिहिले, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको! खूप सारे प्रेम.” टिकेकर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…

उदय टिकेकर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर नाटक, मालिका व चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या ठिपक्यांची रांगोळी मालिकेतही ते झळकले होते. मराठीसह काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

हेही वाचा- अंकिता लोखंडेआधी विकी जैनच्या आयुष्यात होती ‘ही’ अभिनेत्री, अनेक मालिका व चित्रपटांमध्ये केलंय काम, फोटो व्हायरल

आरती अंकलीकर-टिकेकर या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत. आपल्या गोड आवाजाने त्यांनी अनेकांना मंत्रमुग्ध केले आहेत. संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना अनेक पुरस्कारांबरोबरच राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. भारताबरोबर परदेशातही त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

Story img Loader