मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्याकडे पाहिले जाते. त्या दोघांच्या फोटोवर ‘Made for each other’ आणि ‘Couple Goal’ अशा अनेक कमेंट पाहायला मिळतात. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच उमेश आणि प्रियाने आणखी एक स्वप्न पूर्ण केले आहे. त्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

उमेश कामतने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत उमेश कामत हा स्काय डाईव्ह करताना दिसत आहे. यात स्काय डाईव्ह करण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर असलेली भीती आणि ते केल्यानंतर झालेला आनंद स्पष्ट दिसत आहे.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

उमेश कामतची पोस्ट

“मला आयुष्यात कधी वाटल नव्हत मी कधी skydive करण्याचा विचार सुद्धा करू शकेन. मला उंचीची भयंकर भिती वाटते, height fobia म्हणतात ते काय ते. साध्या इमारतीच्या गच्चीवरून खाली बघितलं तरी हातपाय गळून जातात. म्हणूनच आयुष्यात एकच काय तो treck केला आणि शपथ घेतली परत कधीही trekking च्या वगैरे भानगडीत पडायचं नाही.

आमचा Australia दौरा ठरला तेव्हा 4 दिवस trip extend करायचं ठरवलं. पण planning करायला फारसा वेळ नाही मिळाला. तरी skydive हा विचार दूर दूर पर्यन्त नव्हता, पाण्याची भिती नसल्याने scuba dive करायचं मी आणि प्रियाने ठरवलं. पण वेळेच्या अभावामुळे Queensland ला जाउन scuba करणं अवघड दिसायला लागलं. आणि अचानक एक दिवस कळलं आशुतोष ने Australia दौऱ्यावर skydive च booking केलय. प्रिया excite झाली तिने ठरवलं ती पण करणार आणि तिने मला विचारलं तू पण कर ना. तेव्हा booking साठी सगळे पैसे भरायचे नव्हते,आणि मी त्या मोहाला बळी पडलो, म्हटलं आता हो म्हणू नंतर माघार घेउ. पण तो दिवस आणि skydive झाल्यावरचा आजचा दिवस….मी माझी भिती घालवण्यासाठी केलेला प्रयत्न हा अविस्मरणीय अनुभव होता.

मला हे करण्यासाठी confidence देणाऱ्या सगळ्यांना मनापासून Thank you पण Special Thank you and lots of love to प्रिया @priyabapat आणि आशु, त्यांना माझी भिती माहीत होती पण मी हा अनुभव घ्यावा अशीही मनापासून इच्छा होती. पण मला force न करता, हळूच मधे मधे confidence देत माझ्या nervousness ला confidence मधे बदललं म्हणून Thank you. Thank you For being with me”, असे उमेश कामतने म्हटले आहे.

त्याबरोबरच प्रिया बापटनेही स्काय डाईव्हचा अनुभव शेअर केला आहे. त्याचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. “अखेर भीतीवर मात केली. यावेळी मला पक्षी असल्यासारखं वाटत होतं. अखेर मी ते केले”, असे तिने यावेळी म्हटले.

आणखी वाचा : लग्नाच्या तीन वर्षांनी शर्मिष्ठा राऊतचा पतीबद्दल खुलासा, म्हणाली “प्रेमात कायम…”

दरम्यान सध्या उमेश कामत आणि प्रिया बापट हे दोघेही सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. त्या दोघांनीही अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. त्यांच्या या फोटोची सर्वत्र चर्चा रंगली होती.

Story img Loader