Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance : ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वापासून अभिनेता उत्कर्ष शिंदे घराघरांत लोकप्रिय झाला. आपल्या संयमी खेळामुळे त्याला महाअंतिम फेरीपर्यंत मजल मारता आली होती. शो संपल्यावरही त्याची लोकप्रियता कायम आहे. उत्कर्ष उत्तम अभिनेत्याप्रमाणे तो उत्कृष्ट कवी, लेखक आणि गायक म्हणून देखील ओळखला जातो. पण, यापूर्वी अभिनेत्याचं नृत्य कौशल्य प्रेक्षकांनी कधीच पाहिलं नव्हतं. त्याची झलक उत्कर्षने नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या संपूर्ण देशभरात एक वेगळी क्रेझ निर्माण झाली आहे. या चित्रपटातली गाणी देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहेत. यापैकी ‘पीलिंग्स’ हे गाणं रश्मिका मंदाना व अल्लू अर्जुन यांच्यावर चित्रित झालं आहे. ‘पीलिंग्स’ गाण्यात रश्मिका आणि अल्लू अर्जुन एकदम जबरदस्त एनर्जीसह डान्स करताना दिसतात. त्यांच्या डान्सिंग केमिस्ट्रीचं सर्वत्र कौतुक देखील करण्यात आलं. या गाण्याची भुरळ केवळ सामान्य लोकांना नव्हे तर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना देखील पडली आहे. उत्कर्ष शिंदे सुद्धा याच गाण्यावर थिरकला आहे.
उत्कर्ष शिंदेने ‘पीलिंग्स’ गाण्यावर जबरदस्त एनर्जी लावून डान्स केला आहे. याचा खास व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पुष्पा स्टाइल हुबेहूब लूक करत आणि तशीच एनर्जी लावत उत्कर्षने या गाण्यावर हटके डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्यासह लोकप्रिय अभिनेत्री झेबा शेख हिने स्क्रीन शेअर केली आहे. झेबाने रश्मिकासारखी वेस्टर्न साडी, केसाला वेणी, पायात शूज घालून या ‘पीलिंग्स’ गाण्यावर डान्स केला आहे.
उत्कर्ष आणि झेबा यांचा डान्स पाहून नेटकरी सुद्धा थक्क झाले आहेत. अभिनेत्याच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मानसी नाईक, तन्मय पाटेकर, अमितराज यांनी कमेंट्स करत या दोघांना प्रोत्साहन दिलं आहे.
तर, अन्य युजर्सनी, “दादा खतरनाक”, “दादा एक नंबर कमाल डान्स झालाय”, “सेम टू सेम पुष्पा”, “NTR ला टक्कर देणार आता तुम्ही”, “फायर दादा”, “मराठी हिरो विरुद्ध साऊथ हिरो” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी उत्कर्षचं कौतुक केलं आहे.