अभिनेता विकास पाटील हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंत त्याने अनेक मराठी मालिका, नाटकांमधून वेगवेगळ्या शैलीच्या भूमिका साकारल्या. तर बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात तो सहभागी झाला होता. या कार्यक्रमामुळे त्याचा चाहतावर्ग खूप वाढला. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत असतो. तर आता नुकतीच त्याने त्याच्या गावाकडील घराची आणि शेतीची झलक त्याच्या चाहत्यांना दाखवली आहे.

विकास पाटीलने काही महिन्यांपूर्वी त्याच्या कोल्हापुरातील गावी नवं घर बांधलं आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून गावाकडील घराच्या वास्तुपूजेचे फोटो त्याने शेअर केले होते. तर आता त्याने या घरातील गच्चीवरून त्यांची शेतीही दाखवली आहे.

Borgaonkarwadi parking lot, Kalyan,
सव्वाकोटीचे भाडे थकविल्यामुळे कल्याणमधील बोरगावकरवाडी वाहनतळ पालिकेच्या ताब्यात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
Shegaon taluka , Nandura taluka , hair fall ,
भय तिथले संपत नाही… केसगळती, टक्कल साथीचा शेजारी तालुक्यातही शिरकाव; रुग्णसंख्या दीडशेच्या घरात
Committee to investigate Eklavya School case takes note of student protest
एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल
Chichghat Rathi village in Vidarbha
गाव करी ते राव नं करी, ‘हे’ गाव ठरले विदर्भात अव्वल
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज

आणखी वाचा : “आयुष्य जगल्याचा अनुभव…”, प्रसिद्ध अभिनेत्याने मानले स्वामी समर्थांचे आभार, पोस्ट चर्चेत

विकास नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स त्याच्या चाहत्यांशी शेअर करत असतो. नुकताच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्याने घरातील गच्चीवर उभं राहून त्यांच्या घराच्या बाजूला असलेलं त्यांचं हिरवंगार शेत दाखवलं. हा व्हिडीओमध्ये त्याचे वडील शेतात काम करताना दिसत आहेत, तर त्याची आई गच्चीत काम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं, “खो गयए हम कहां… माझं गाव, माझं शेत, माझं घर… जगात भारी…कोल्हापुरी! आई-बाबा त्यांच्या कामात गर्क आणि मी माझ्या.”

हेही वाचा : एका हातात छत्री, दुसऱ्या हातात भाजी…; शहरापासून दूर जाऊन मराठमोळी अभिनेत्री रमली स्वत:च्या शेतात

त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ आता त्याच्या चाहत्यांना खूप आवडला असून त्याचं हे शेत आणि हे घर खूप सुंदर आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

Story img Loader