फेब्रुवारीचा महिना सुरु झाला की प्रत्येकाला ‘व्हॅलेंटाइन डे’ चाहुल लागते. फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना असं देखील मानलं जातं. प्रेमात पडलेले आणि प्रेमात पडू इच्छिणारे असे सगळेचजण या महिन्याची आतुरतेनं वाट पाहताना दिसतात. जगभरात १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. यानिमित्ताने प्रत्येक कपल हे काही खास प्लॅन करत असतं. नुकतंच अभिनेता विराजस कुलकर्णीने त्याचा ‘व्हॅलेंटाईन डे’ चा प्लॅन सांगितला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासूनच सर्वत्र ‘व्हॅलेंटाईन डे’ची क्रेझ पाहायला मिळते. कॉलेजमध्ये असलेली तरुणाई तर विविध डेजही साजरे करताना दिसते. त्यामुळे सर्वत्र प्रेमाचे वातावरण पाहायला मिळते. सोशल मीडियामुळे हल्ली ‘व्हॅलेंटाईन डे’ ची क्रेझ खूप वाढली आहे. नुकतंच विराजस कुलकर्णीने ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या प्लॅनबद्दल खुलासा केला.
आणखी वाचा : “विराजसशी लग्न झाल्यावर…” शिवानी रांगोळे सासूला कोणत्या नावाने हाक मारते? स्वत:च केला खुलासा

Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
jijau Jayant 2025
जिजाऊंच्या जयघोषाने मातृतीर्थ दुमदुमले, सिंदखेडराजात पाऊण लाख शिवभक्त
India’s culture encourages diversity in practice and thought.
चलनी नोटा, वस्त्राचा तुकडा आणि भारतीय थाळी विविधतेत एकतेचं प्रतीक कसं ठरतात?
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा
What Uday Samant Said?
Uday Samant : उदय सामंत यांच्या हाती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची अधिसूचना; म्हणाले, “आज अत्यंत आनंदाचा दिवस..”

विराजस कुलकर्णीने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘विचारा बोलूया’ असं सेशन घेतलं होतं. त्यात त्याला एका चाहत्याने ‘लग्नानंतर पहिला ‘व्हॅलेंटाईन डे’चा काय प्लॅन’ असे विचारले होते. त्यावर त्याने “लग्नानंतरचा पहिला असला, तरी तसा चौथा पाचवा आहे आमचा…सो सवय झालिये…!” असे उत्तर विराजसने दिले आहे.

अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखलं जातं. त्या दोघांनी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. विराजस आणि शिवानी हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्या दोघांचा विवाहसोहळा अगदी पारंपारिक पद्धतीने पार पडला होता. त्यावेळी दोघांनीही दाक्षिणात्य पद्धतीची वेशभूषा केली होती.

Story img Loader