‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील प्रत्येक मालिकेचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘मुरांबा’. अभिनेता शशांक केतकर, शिवानी मुंढेकर, निशाणी बोरुळे, सुलेखा तळवलकर, प्रतिमा कुलकर्णी, अभिजीत चव्हाण अशा अनेक कलाकारांची मांदियाळी असलेली ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.
‘मुरांबा’ या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. शशांकने साकारलेला अक्षय असो किंवा शिवानीने साकारलेली रमा असो प्रत्येक पात्र आता प्रेक्षकांना आपल्यास वाटू लागलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.
हेही वाचा – कंगना रणौतला लोकसभा निवडणुकीचं तिकिट मिळताच मराठी अभिनेत्रीने केलं समर्थन, म्हणाली…
या लोकप्रिय अभिनेत्याच्या एन्ट्रीमुळे ‘मुरांबा’ मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेता आशय कुलकर्णी ‘मुरांबा’ मालिकेत झळकणार आहे. यासंदर्भात आशयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “येतोय मुरांबा घेऊन खळबळ करायला…नक्की पाहा…स्टार प्रवाह,” असं लिहित त्याने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.
याशिवाय ‘मुरांबा’ मालिकेचा एक होळीचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये आशयची एन्ट्री पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून आशय हा रेवतीच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा – “आपला कोकण भारी आसा…”, मुग्धा वैशंपायन पहिल्यांदाच गेली काजूच्या बागेत, पोस्ट करत म्हणाली…
दरम्यान, आशयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने यापूर्वीही बऱ्याच मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पाहिले न मी तुला’, ‘माझा होशील ना’ या मालिकेत आशय झळकला होता. लवकरच तो ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.