‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’मध्ये काही महिन्यांपूर्वी एका अभिनेत्याची एन्ट्री झाली होती. त्यांच्या एन्ट्रीमुळे मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. आता हा अभिनेता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ मालिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमधून या अभिनेत्याची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळत आहे.

‘मुरांबा’ मालिकेत झळकलेला हा दुसरा तिसरा कोणी नसून आशय कुलकर्णी आहे. रेवतीचा बॉयफ्रेंड अर्थवच्या भूमिकेत झळकलेला आशय कुलकर्णी आता ‘सुख कळले’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अद्याप आशयने याबाबत स्वतः जाहीर केलं नसलं तरी मालिकेच्या प्रोमोमधील एन्ट्री पाहून आशय कुलकर्णीचं असल्याचं म्हटलं जातं आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या लग्नाआधी RSS प्रमुख मोहन भागवतांनी अँटिलियामध्ये घेतली अंबानी कुटुंबाची भेट, व्हिडीओ व्हायरल

‘सुख कळले’ मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशीने मिथिलाची भूमिका साकारली असून सागर देशमुख माधवच्या भूमिकेत झळकला होता. पण माधवचं निधन झाल्यामुळे मिथिलच्या आयुष्यात एक नवी व्यक्ती येणार आहे आणि ती व्यक्तिरेखा आशय कुलकर्णी साकारणार आहे.

प्रोमोमध्ये, मिथिला माधवचा फोटो पाहून रडत असते. तितक्यात त्यांची मुलगी माधवकडे इच्छा व्यक्त करते. “बाबा आई खूप एकटी आहे. तिच्यासाठी एक एंजल पाठवना.” त्यानंतर घराची बेल वाजते. मिथिला दार उघडते आणि दरवाजा बाहेर श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती असते. तेव्हाच एका व्यक्तीची एन्ट्री होते. पांढरा शर्ट, जीन्स आणि पांढरे त्यावर शूज घातलेली ही व्यक्ती छत्री घेऊन येते. पण ही व्यक्ती नेमकी कोण असते? हे प्रोमोमधून दाखवण्यात आलेलं नाही. पण प्रोमोमध्ये व्यक्तीचा अर्धा चेहरा दाखवल्यामुळे अभिनेता आशय कुलकर्णी असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे आता या व्यक्तीच्या एन्ट्रीनंतर मिथिलाच्या आयुष्यात नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वी मुकेश अंबानींनी ‘या’ लोकांचा आयोजित केला सामूहिक विवाह सोहळा, निमंत्रण पत्रिका आली समो

हेही वाचा – आईप्रमाणेच ईशा अंबानीने देखील IVF द्वारे दिला जुळ्या मुलांना जन्म; खुलासा करत म्हणाली, “ही एक अवघड…”

दरम्यान, आशयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं यापूर्वीही बऱ्याच मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पाहिले न मी तुला’, ‘माझा होशील ना’ या मालिकेत आशय झळकला होता. लवकरच तो ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Story img Loader