अभिनेते अविनाश नारकर हे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं विविध माध्यमातून मनोरंजन करत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमात त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ते ‘झी मराठी’वरील ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘सन मराठी’वरील ‘कन्यादान’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि विनोदी रील्स चांगल्या व्हायरल होतं आहेत. नुकताच त्यांनी एक रील शेअर केला आहे; ज्यामध्ये त्यांनी समस्त नवऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा – Video: ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील सार्थकने आनंदीसाठी घेतला खास उखाणा; म्हणाला, “वचन देतो…”

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य

अभिनेते अविनाश नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कधी फिटनेससंबंधित तर कधी मजेशीर रील शेअर करत असतात. पण काहीदा ते ट्रोल देखील होतात. पण या ट्रोलर्सना पत्नी ऐश्वर्या नारकर चोख प्रत्युत्तर देऊन तोंडं बंद करतात. अविनाश नारकर यांनी आता एक मजेशीर रील शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर ‘असा’ साजरा केला सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस, अभिनेत्याचा संघर्ष ऐकून कलाकार झाले भावुक

या मजेशीर रीलमध्ये बायकोबरोबर भांडणं झाल्यानंतर समस्त नवऱ्यांनी काय करायचं? याचा सल्ला अविनाश नारकर यांनी दिला आहे. हा रील शेअर करत त्यांनी लिहीलं, “सेटवराचा टाईमपास… मज्जा…दिवाळी पाडवा जवळ आलाय… म्हणून तमाम नवरेमंडळींसाठी खास मोलाचा सल्ला…स्वसंरक्षण….अनुभवाचे बोल…”

हेही वाचा – आता ‘या’मध्येही मारली ‘ठरलं तर मग’ मालिकेने बाजी; ‘प्रेमाची गोष्ट’ला…

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानने शुभांगी गोखलेंची केली नक्कल; पाहा व्हिडीओ

अविनाश नारकर यांच्या या मजेशीर रीलवर ऐश्वर्या नारकर यांनी प्रतिक्रियेत हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. तसेच एका नेटकरीनं लिहीलं आहे की, “फक्त बघत राहील ना तर बायको अजून चिडते मग.. आता बोला की तोंड का बंद केले म्हणते.” तसेच दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं की, “छान भारी हं.” तर तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं की, “ईशय संपला…”

दरम्यान, याआधी अविनाश नारकर यांचा ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेतील एक डायलॉग चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते पालक आणि मुलांच्या संवादाविषयी बोलले होते. “ज्या घरात संवाद असतो, मुलांमध्ये आणि पालकांमध्ये, त्या घरातली मुलं आपल्या मर्यादा आखून घेतात. ज्या घरातला संवादच तुटतो ते घर सुद्धा हळूहळू तुटायला लागतं,” असा अविनाश नारकर यांचा तो डायलॉग होता.

Story img Loader