‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे. अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी या पात्रांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अशातच आता मालिकेत रोमांचक वळणं पाहायला मिळणार आहे. अक्षरा आणि अधिपती लग्नबंधनात अडकणार आहेत. आजपासून अक्षरा आणि अधिपतीचा साखरपुडा विशेष सप्ताह रंगणार आहे. यानिमित्तानं गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. यातील एका व्हिडीओमुळे प्रशांत दामलेंची या मालिकेत एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण हे खरं की खोटं? यामागचा खुलासा भुवनेश्वरी म्हणजे अभिनेत्री कविता मेढेकर यांनी केला आहे.
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवर उशीरा कोण येतं? तेजश्री प्रधान म्हणाली, “ठाण्यावरून….”
काही आठवण्यापूर्वी अक्षरा आणि अधिपतीच्या साखरपुड्याच्या निमित्तानं भुवनेश्वरी प्रशांत दामलेंना आमंत्रण देतानाचा व्हिडीओ ‘झी मराठी’नं सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये अक्षरासाठी लिहीलं गाणं प्रशांत दामलेंनी सादर करण्यासाठी साखरपुड्याला यावं, असं आमंत्रण देताना भुवनेश्वरी दिसली होती. याच व्हिडीओमुळे प्रशांत दामलेंची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली. पण या चर्चांना आता कविता मेढेकर यांनी पूर्णविराम दिला आहे.
हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ मधील सायलीचा नणंदेबरोबर ‘बादल बरसा बिजुरी’वर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “पूर्णा आजी…”
हेही वाचा – ‘गदर २’च्या सक्सेस पार्टीत सलमान खानच्या घड्याळाने वेधलं लक्ष; किंमत वाचून व्हाल थक्क
‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी बोलताना कविता मेढेकर म्हणाल्या की, “प्रशांतने तो प्रोमो ‘झी मराठी’साठी आणि माझ्यासाठी केला होता. प्रेक्षकांच लक्ष वेधून घेण्यासाठी तो प्रोमो केला होता. या प्रोमोनंतर प्रशांतची मालिकेत एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू होईल, याची अजिबात अपेक्षा नव्हती. पण खरंच या मालिकेत त्याची एन्ट्री वगैरे काही होणार नाही.”
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानने अपूर्वा नेमळेकरचं एका शब्दात केलं वर्णन; म्हणाली…
दरम्यान, कविता मेढेकर या एकाबाजूला मालिकेतून मनोरंजन करत असल्या तरी दुसऱ्या बाजूला त्यांचं प्रशांत दामलेंबरोबरच ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक सुद्धा सुरू आहे.