India Won Champions Trophy 2025 : भारतीय संघाने न्यूझीलंडचा चार विकेट्स राखून पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चं जेतेपद पटकावत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. सध्या संपूर्ण देशभरातून क्रिकेटप्रेमी भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

भारत वि. न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील अंतिम सामना दुबईत खेळवला गेला. या स्पर्धेत टीम इंडियाने एकही सामना न गमावता ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे. रोहित शर्मा या सामन्याचा सामनावीर ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी याशिवाय बॉलीवूडसह काही मराठी कलाकार सुद्धा दुबईत पोहोचले होते. भारताच्या विजयानंतर मराठी सिनेविश्वातील कलाकारांनी पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

प्रसाद ओक, श्रेयस तळपदे, सौरभ चौघुले, अमृता बने, समीर परांजपे, सलील कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, शिव ठाकरे, अद्वैत दादरकर, शुभंकर तावडे, महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकारांनी यांच्यासह असंख्य सेलिब्रिटींनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत भारताच्या विजयावर आनंद व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

अभिजीत केळकरने “होळीच्या आधी दिवाळी” अशी पोस्ट शेअर करत भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. तसेच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेते स्वप्नील राजशेखर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतात, “पोरं राजासारखी जिंकली…न्यूझीलंडचं नाक दोनदा फोडलं याचा विशेष आनंद…यंदा किवी पिळायलाच हवा होता.”

India Won Champions Trophy 2025
अभिनेता अभिजीत केळकरची भारताच्या विजयानंतर पोस्ट ( India Won Champions Trophy 2025 )

लोकप्रिय गायत सलील कुलकर्णी यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ते लिहितात, “हिटमॅनला अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच मिळालं आहे. आता त्याला ट्रोल करणारे निघून जाऊ शकतात.” या पोस्टसह गायकाने रोहित-विराटचा एकत्र फोटो शेअर केला आहे.

India Won Champions Trophy 2025
अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची भारताच्या विजयानंतर पोस्ट ( India Won Champions Trophy 2025 )
India Won Champions Trophy 2025
लोकप्रिय गायक सलील कुलकर्णी यांची भारताच्या विजयानंतर पोस्ट ( India Won Champions Trophy 2025 )

दरम्यान, मनोरंजनविश्वासह राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी सुद्धा चॅम्पियन्स टॉफ्री जिंकल्यावर टीम इंडियाचं भरभरून कौतुक केलं आहे. न्यूझीलंडवर विजय मिळवत भारतीय संघाने गेल्या १० महिन्यात दुसरी आयसीसी स्पर्धा आपल्या नावे केली आहे.

Story img Loader