मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिज्ञा भावेचा नंबर टॉपला आहे. अभिज्ञा सध्या तिला मिळालेल्या वेळेमध्ये कुटुंबीय तसेच मित्र-परिवाराबरोबर एण्जॉय करत आहे. काही दिवसांपूर्वी पती मेहुल पैचा वाढदिवस तिने अगदी जोरदार साजरा केला. यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. या फोटो व व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. मेहुलबरोबर अभिज्ञाने शेअर केलेला एक फोटो विशेष चर्चेत आला आहे.
अभिज्ञाने फोटो शेअर केल्यानंतर तिचं पोट वाढलेलं दिसलं. याचवरुन तिला नेटकऱ्यांनी बरंच ट्रोल केलं. इतकंच नव्हे तर काहींनी ती गरोदर असल्याचाही अंदाज लावला. “तू गरोदर आहेस का?” असा प्रश्नही अभिज्ञाला अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून विचारला. पण यावर अभिज्ञाने मौन कायम राखलं. मात्र एका युजरने केलेली कमेंट पाहून अभिज्ञाने त्याला सडेतोड उत्तर दिलं.
आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत व्हिडीओ केला शेअर, म्हणाली…
अभिज्ञाने मेहुलबरोबरचा एक फोटो शेअर केला. या फोटोवर “पोट खूप सुटलं आहे. नाही जमलं” अशी एका युजरने कमेंट केली. या कमेंटवर अभिज्ञाला रिप्लाय करण्याचा मोह आवरला नाही. तिने कमेंट करणाऱ्या युजरला चांगलंच सुनावलं. तसेच एक मोलाचा सल्लाही दिला. अभिज्ञा म्हणाली, “हो आणि त्याचबरोबर माझं करिअरही सुटलं आहे. पण तुमचं तर फक्त पोटच सुटलेलं दिसत आहे”.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/05/bhave.jpg?w=830)
“माझ्या करिअरमधून तुम्ही प्रेरणा घेतली तर तुमच्या पोटाकडे लोकांचं लक्ष जाणार नाही”. अभिज्ञाने अगदी योग्य शब्दांमध्ये तिचं मत मांडलं. ‘तू तिथे मी’ या कार्यक्रमात अभिज्ञा शेवटची दिसली. या मालिकेमध्ये तिने साकारलेली वल्ली ही नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. आता अभिज्ञा कोणत्या नव्या भूमिकेत काम करताना दिसणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.