मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. अभिज्ञा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अभिज्ञा भावेने काही वर्षांपूर्वी मेहुल पैबरोबर लग्नगाठ बांधली. नुकतंच एका मुलाखतीत अभिज्ञाने तिच्या लग्नादरम्यानचा घडलेल्या एका गोष्टीचा खुलासा केला आहे.
अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. जवळपास १५ वर्षांपासून ते दोघे एकमेकांना ओळखायचे. पण कॉलेजनंतर त्यांचे संपर्क तुटला. यानंतर काही दिवसांनी ते दोघेही पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानतंर ६ जानेवारी २०२१ रोजी त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. नुकतंच अभिज्ञाने तिचा वाढदिवस साजरा केला. अभिज्ञाच्या वाढदिवसानिमित्त मेहुलने दुबईत खास प्लॅनिंग केले होते.
आणखी वाचा : “माफ करा मला…”, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावनिक पोस्ट
नुकतंच एका मुलाखतीत अभिज्ञाने मेहुलबरोबर घडलेल्या एका गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. “मी आणि मेहुल गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो. त्यावेळी लग्न करायचं की नाही, यावर आम्ही खूप विचार करत होतो. मी मुळातच खूप जास्त बडबड करणारी आहे. तर मेहुल हा माझ्या अगदी विरोधी आहे. त्यामुळे आमचे जुळेल की नाही, असा प्रश्न आम्हाला पडला होता. पण मग आम्ही जसे आहोत, तसेच कायम राहू, यावर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर आता मी शांत आणि मेहुल जास्त बडबड करणारा झाला आहे”, असे अभिज्ञा म्हणाली.
“मी खूप जास्त फूडी आहे. मला डाएट करायला अजिबात आवडत नाही. मला अनेकदा किचनमध्ये शाकाहारी पदार्थ बनवायला आणि खायला आवडतात. लहानपणापासूनच मी हे असं जेवण करत असल्याने मी मांसाहार घेतला की माझे पोट लगेच बिघडते. मला घरची पोळी, भाजी, भात, वरण हे सर्व जेवण बनवता येते. पण मला अनेक खास पदार्थ बनवण्याची आणि ते शिकण्याची आवड आहे. लग्नाअगोदर मेहुल जेव्हा मला भेटायला आला होता, तेव्हा मी त्याच्यासाठी कांदेपोहे बनवले होते. त्यावेळी मेहुलची बोलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मेहुलने पोहे खाल्ल्यानंतर मला टोमणा मारला होता. तू मीठ घेऊन यात पडलीस का? असे मेहुलने मला म्हटले होते. त्यावर मी हो माझ्या हातून मीठ थोडं जास्त पडलंय, अशी कबुली तिने दिली होती.”
आणखी वाचा : “ती माझी सवत होऊ नये म्हणून…” अभिज्ञा भावेने सांगितला ‘तो’ किस्सा
आता लग्नानंतर अभिज्ञा ही स्वयंपाक घरात फार कमी जाते. कारण तिच्या सासूबाई उत्तम जेवण बनवतात. पण कधीतरी वेळ मिळाला तर ती किचनमध्ये जाऊन विविध पदार्थ बनवते. पण त्यावेळी एखाद्या पदार्थात मीठ घालायचे असेल तर मेहुल हा तिकडे उपस्थित असतो.
दरम्यान लग्नानंतर काही महिन्यातच मेहुलला कॅन्सरचे निदान झाले होते. त्यावेळी खचून न जाता अभिज्ञाने मेहुलला भक्कम साथ दिली होती. ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती. ती झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेत वल्ली ही भूमिका साकारताना दिसली होती. तिच्या या भूमिकेला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसला होता.