Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra : गेल्या १०५ दिवसांपासून ‘बिग बॉस’चं १८वं पर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करत होतं. ६ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झालेल्या या पर्वाने १९ जानेवारीला प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता करणवीर मेहरा ठरला. प्रेक्षकांच्या भरघोस मतांनुसार करणवीर मेहरा ‘बिग बॉस १८’ विजयी झाल्याची घोषणा सलमान खानने केली. विवियन डिसेना हा पहिला रनर-अप तर रजत दलाल दुसरा रनर-अप ठरला. करणवीर जिंकल्यामुळे सध्या इतर कलाकार मंडळींसह चाहते त्याला शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करताना दिसत आहेत.

‘बिग बॉस’चं १८वं पर्व जिंकल्यानंतर करणवीर मेहरा म्हणाला की, मी ज्या क्षणाची वाट बघत होतो. अखेर तो क्षण आलाच. जनतेचा लाडका विजयी झाला. करणला ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह ५० लाखांचा धनादेश मिळाला. याआधी करणने ‘खतरों के खिलाडी’चं १४वं जिंकलं होतं. त्यामुळे सध्या करणची तुलना सिद्धार्थ मल्होत्राबरोबर केली जात आहे. दरम्यान, करणवीर मेहरा विजयी होताच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर केली. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Bigg Boss 18 Salman Khan announced Karan Veer Mehra as a winner Chum darang and Shilpa Shirodkar became happy
Bigg Boss 18: सलमान खानने करणवीर मेहराचं नाव घेताच चुम, शिल्पाला झाला आनंद; बाकी सदस्यांच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग, पाहा व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
actor yogesh mahajan death
मालिकेचं शूटिंग करून हॉटेलमध्ये झोपले अन् उठलेच नाहीत, मराठमोळे अभिनेते योगेश महाजन यांचे निधन
Saif ali Khan Attacker attack
Saif Ali Khan : एका पराठ्यामुळे सापडला सैफचा हल्लेखोर; पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? वाचा घटनाक्रम!
Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra first post
Bigg Boss 18 जिंकल्यावर करणवीर मेहराची पहिली पोस्ट, म्हणाला, “दुसरी ट्रॉफी…”
Sanjay Raut on saif ali khan (1)
Sanjay Raut : “सैफ आणि करीना लव्ह जिहादचे प्रतिक होते अन् आता…”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!
Saif Ali Khan stabbing accused
Saif Ali Khan Stabbing Case: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची बाजू मांडण्यासाठी भर कोर्टात दोन वकिलांमध्ये जुंपली
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा – Bigg Boss 18: सलमान खानने करणवीर मेहराचं नाव घेताच चुम, शिल्पा झाला आनंद; बाकी सदस्यांच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग, पाहा व्हिडीओ

करणवीर मेहराला पाठिंबा देणारी ही मराठी अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून अभिज्ञा भावे आहे. अभिज्ञा भावने व्होटिंग लाइन बंद होण्यापूर्वी करणसाठी खास पोस्ट केली होती. दोघांचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं होतं, “या धाडसी माणसाला व्होट करा. लवकरच व्होटिंग लाइन बंद होणार आहे. करणला विजयी करा, कारण तो त्यास पात्र आहे.”

अभिज्ञा भावे इन्स्टाग्राम स्टोरी
अभिज्ञा भावे इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता व्यवसाय क्षेत्रात करणार पदार्पण, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

त्यानंतर करणवीर मेहरा विजयी होताच अभिज्ञाने दुसरी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. यावर तिने लिहिलं की, येSSSS…अखेर खरा निकाल लागला. ओके बाय.

अभिज्ञा भावे इन्स्टाग्राम स्टोरी
अभिज्ञा भावे इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर तेजश्री प्रधान ‘या’ आश्रमात घालवतेय दिवस, वासराबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात सहा सदस्य पोहोचले होते. यामधून सर्वात आधी ईशा सिंह एविक्ट झाली. त्यानंतर चुम दरांग, अविनाश मिश्रा घराबाहेर झाला. या दोघांनंतर रजत दलाल एलिमिनेट झाला. हे एलिमिनेशन जाहीर करताना सलमान खानला आश्चर्याचा धक्का बसला होता. अखेर करणवीर मेहरा, विवियन डिसेना या दोघांत चुरस पाहायला मिळाली आणि करण ‘बिग बॉस १८’चा महाविजेता ठरला.

Story img Loader