मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करताना आपल्याला दिसतात. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, गिरिजा ओक या कलाकारांचा मराठीतून हिंदी कलाविश्वापर्यंत पोहोचण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. काही कलाकारांना लगेच संधी मिळते, तर काही जणांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागतो. आता मराठी विश्वातून आणखी एक अभिनेत्री हिंदी मालिकेत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “२०१९ मध्ये ‘बाईपण भारी देवा’साठी निर्माता मिळत नव्हता”, केदार शिंदेंना आठवले जुने दिवस; म्हणाले, “तेव्हा डोळ्यात पाणी आलं…”

‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘रंग माझा वेगळा’, ‘तू तेव्हा तशी’ छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच हिंदी मालिकेत पदार्पण करणार आहे. अभिज्ञाने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. अभिज्ञाने तिच्या मालिकेतील लूकबरोबर पहिला प्रोमोही शेअर केला आहे.

हेही वाचा : ‘हर हर महादेव’चा जयघोष! अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘OMG 2’ चा दमदार टीझर प्रदर्शित

अभिज्ञाने सेटवरील तिच्या लुकचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, ” जास्त काही नाही…१२ वर्षांची मेहनत आणि जिद्द” असे लिहिले आहे. स्टार प्लसवरील ‘बातें कुछ अनकही सी’ या मालिकेत अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अभिज्ञाने नव्या मालिकेबद्दल पोस्ट शेअर केल्यावर मराठी चित्रपटसृष्टीतून तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. या मालिकेत बहुतांश मराठी कलाकार दिसणार आहे.

हेही वाचा : “मी पुराव्यांसहित सांगू शकतो की उद्धव ठाकरे…”, अवधूत गुप्तेच्या ‘त्या’ प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

दरम्यान, ‘बातें कुछ अनकही सी’ या मालिकेत अभिनेता मोहित मलिक आणि मराठमोळी अभिनेत्री सायली साळुंखे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही मालिका ‘स्टार प्लस’ या हिंदी वाहिनीवर लवकरच सुरु होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress abhidnya bhave will soon debut in hindi serial name baatein kuch ankahee si sva 00