अनेक मराठी कलाकार आपलं हक्काचं घर घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर काही मराठी कलाकारांनी नव्या घरात गृहप्रवेश केला तर काही कलाकारांनी गाडी खरेदी केली. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री अदिती द्रविड.

भाड्याच्या घरात राहण्याऱ्या अभिनेत्री अदिती द्रविडने मुंबईत स्वतःच हक्काचं घर घेतलं आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तिने तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला. याचे फोटो, व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर काल तिने नव्या घराच्या सुंदर नेमप्लेटचा फोटो शेअर करून भाड्याच्या घरापासून ते हक्काचं घर घेण्याचा खडतर प्रवास चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

in Mumbai 55 percent increase in price of affordable homes
मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : संतप्त जमावाच्या मारहाणीतून बेस्ट बसचालक संजय मोरेचा जीव ‘या’ माणसामुळे वाचला!
Panvel Virar House expensive , House expensive Panvel,
पाच वर्षात पनवेल, विरारची घरे महागली; दोन्ही ठिकाणच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
देवेंद्र फडणवीस येती घरा…तोची …
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य व साक्षीचा शाहरुख-माधुरीच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

अदितीने लिहिलं आहे, “२०१५ला पहिल्यांदा मुंबईत आले होते. त्यानंतर अनेक घरं बदलली. भाड्याने, शेअरिंग मध्ये, रुममेंटसबरोबर, सर्व काही! चांगले वाईट अनुभव घेत अभिनयचा प्रवास चालू होता. २०१९ मध्ये एक शॉर्टफिल्म शूट करत होते. करोनाचा काळ असल्याने तेव्हा भाड्याचं घर सोडलं होतं. एका दिवसात शूट संपणं अपेक्षित होतं म्हणून कुठेही सोय बघून ठेवली नव्हती. पॅकअप होताना समजलं की, अजून एक दिवस शूट वाढलं आहे अणि कोणतीही सोय करायच्या आत दिग्दर्शक ‘पॅकअप’ म्हणाले अणि एका क्षणात १०० लोकांनी गजबजलेला सेट, पूर्ण रिकामा झाला.”

“बरीच रात्र झाली होती, काय करावं काही सुचेना, मला ऐनवेळी तिथे रेवती लिमये (@rewatilimaye) भेटली आणि अडचण कळताच क्षणी ती मला तिच्या घरी घेऊन गेली. @soum1980 @rewatilimaye मी तुमचे सदैव ऋणी राहीन. पण ती पूर्ण रात्र झोप लागली नाही. विचार करत राहिले आणि स्वतःच घर घ्यायचं हे त्याच रात्री ठरवलं. त्यानंतर ४ वर्ष गेली, कष्ट आणि आई वडिलांच्या आशीर्वादानी आज फायनली हे घडतयं. पण अजूनही माझा यावर विश्वास बसत नाहीये. या प्रवास जे माझ्याबरोबर होते, त्या सर्वांची मी आभारी आहे. @rupali.nimbalkar.7 @abhiraj_nimbalkar @archana.wagh @patwardhanswapna @tikaleonkar @gayatritikale तुमचे विशेष आभार. खरं म्हणतात, मुंबई सपनों का शेहेर हैं! आणि मी पुन्हा मुंबईच्या प्रेमात पडत आहे,” असं अदितीने लिहिलं आहे.

हेही वाचा – Video: लग्नातच घटस्फोट! ‘अंतरपाट’ नव्या मालिकेच्या हटके प्रोमोने वेधलं लक्ष, कधीपासून सुरू होणार जाणून घ्या…

अदितीच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “अभिनंदन”, “खूप अभिमानस्पद क्षण आहे”, “ही फक्त सुरुवात आहे…अजून पिक्चर बाकी आहे”, अशा अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दरम्यान, अदितीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे गाणं लिहिलं होतं. याशिवाय तिने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये काम केलं होतं. या मालिकेत तिने अभिमन्यूची मैत्रीण नंदिनीची भूमिका साकारली होती. लवकरच अदिती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Story img Loader