टीव्ही अभिनेत्री अदिती द्रविड ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारून अदिती घराघरात पोहोचली. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतही ती दिसली होती. अदितीने नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने आयपीएल व क्रिकेटबद्दल भाष्य केलं.

अदितीने ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलबद्दल परखड मत मांडलं. ती म्हणाली, “माझ्यासारख्या लोकांना आयपीएमधीलही सगळे खेळाडू माहीत नसतात. सगळ्या खेळाडूंची नावं माझ्यासारख्या कित्येक लोकांना माहीत नाहीत. आयपीएल न आवडण्याचे हे एक कारण आहे. आयपीएल ही एक मिक्स भेळ आहे. आपण खेळाला सपोर्ट करतोय, खेळाडूंना करतोय, रंगाला सपोर्ट करतोय, राज्यांना करतोय की नावांना हे कळतंच नाही.”

prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

हेही वाचा>> टॉपलेस फोटोशूटमुळे वाद, अंडरवर्ल्डशी संबंध, ड्रग्ज माफियाबरोबर लग्न अन्…; आता साध्वीचं आयुष्य जगत आहे ममता कुलकर्णी

“क्रिकेट हा एक खेळ आहे आणि माझ्यासाठी देशभक्ती हा मुद्दा आहे. मी लहान असल्यापासून भारताची मॅच बघते. भारत-पाकिस्तानची मॅच…आम्ही सगळे एकत्र मॅच बघायला बसायचो. जागेवरुन हलायचं नाही, कारण उठलो की विकेट पडणार, भारत मॅच हरणार…असं सगळं असायचं. माझे वडील अजूनही प्रोफेशनल क्रिकेट खेळतात. या सगळ्यामागे एक भावना असायची. मनापासून वाटतंय म्हणून आम्ही सपोर्ट करायचो,” असंही पुढे अदिती म्हणाली.

हेही वाचा>> “आता तू पण विचित्र…”, फोटोशूटसाठी हटके पोझ दिल्यामुळे प्राजक्ता माळी ट्रोल

“आयपीएल सुरू झाल्यानंतर या गोष्टींवर माझं इमोशन नाही, हे मला जाणवलं. सचिन तेंडुलकर व रिकी पाँटिग एका टीममध्ये असल्याचा त्रास व्हायचा. ऑस्ट्रेलियन किती माजोरडे आहेत, असं आपण म्हणायचो. या गोष्टींमुळे मला आयपीएल आवडत नाही,” असंही पुढे अदितीने सांगितलं.

हेही वाचा>> अर्जुन तेंडुलकरसाठी गुजरात टायटन्सनेही लावलेली बोली, पण…; मुंबई इंडियन्सकडून सचिनच्या लेकाला किती मानधन मिळतं?

अदिती द्रविड ही भारतीय क्रिकेटर राहुल द्रविडची पुतणी आहे. अदितीने ट्वीटरवर घेतलेल्या #Askme सेशनमध्ये एका चाहत्याने याबाबत तिला प्रश्न विचारला होता. यावेळी तिने “राहुल द्रविड माझे चुलत काका आहेत,” असं सांगितलं होतं.

Story img Loader