गरोदरपणात नऊ महिने वेगवेगळ्या गोष्टींचे डोहाळे लागतात. कोणाला गोड, आंबट खाण्याची इच्छा होते, तर कोणाला तिखट पदार्थ सतत खावेस वाटतात. माती, खडू अगदी कशाचेही डोहाळे गरोदरपणात लागतात. असंच काहीस एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबरोबर घडलं आहे. या अभिनेत्रीला गरोदरपणात चक्क बिअरचे डोहाळे लागले होते. याबाबत तिनं एका मुलाखतीमधून खुलासा केला आहे.

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अदिती सारंगधर हिला बिअरचे डोहाळे लागले होते. ‘आरपार’ या युट्यूब चॅनलला अदितीने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिनं गरोदरपणात लागलेल्या डोहाळ्यांविषयी सांगितलं.

Appi Aamchi Collector
Video: “परमेश्वरा या बापाची तळमळ…”, अमोलसाठी अर्जुनची देवाकडे प्रार्थना; ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत पुढे काय होणार?
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड…
Prajakta Mali
“…तर माझं वजन ७० किलो असतं”, ५१ किलो वजन असलेली प्राजक्ता माळी म्हणाली, “मी कमी बेशिस्त…”
Punha Kartvya Aahe
Video : वसुंधराच्या हक्कासाठी आकाश उचलणार मोठे पाऊल; आईची अट मान्य करत म्हणाला, “तुमचा हक्काचा मान…”
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Wedding
शुभमंगल सावधान! ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; फोटो शेअर करत म्हणाली…
ashok saraf reaction on television comeback
“मी मालिका करणार नव्हतो, पण…”, अशोक सराफ यांनी सांगितलं टेलिव्हिजनवर कमबॅक करण्याचं कारण; म्हणाले, “निवेदिता…”
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Bigg Boss Marathi Fame Chota Pudhari Aka Ghanshyam Darode upset with nikki and arbaz
निक्की-अरबाजने ‘ते’ वचन पाळलंच नाही! छोटा पुढारी घन:श्यामची जाहीर नाराजी; नेटकरी म्हणाले, “दोघांनी फक्त तुझा वापर…”

हेही वाचा – Video: संतोष जुवेकरची मराठी मालिकाविश्वात पुन्हा दमदार एन्ट्री, झळकणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत

अदिती सारंगधर म्हणाली, “गरोदर असताना सुरुवातीला मी खूप उत्साही होते. मला बिअरचे डोहाळे लागले होते. मी गरोदरपणात बिअर प्यायचे. मी या काळात भारतीय पदार्थ खाल्ले नाहीत. मी सॅलेड आणि बिअर एवढंच प्यायचे. मी डॉक्टरांना विचारलं, काय करू? बिअर नाही प्यायले तर मला कसं तरी व्हायचं. मला राग यायचा. मग त्या (डॉक्टर) म्हणाल्या, दोन-दोन घोट प्या. मग मी नऊ महिने बिअर दोन-दोन, तीन-तीन घोट प्यायचे. खरंच बोलतेय, खोटं नाही. मी भात आणि फोडणीचे वगैरे पदार्थ आले ना तर त्या पदार्थामधील एक-एक मोहरी काढून बाजूला करायचे. घरभर १००-२००-३०० मोहऱ्या पडलेल्या असायच्या. त्यामुळे गरोदरपणात भारतीय पदार्थ बंद केले. सॅलेड आणि बिअर एवढंच.”

हेही वाचा – अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेच्या घरावर मोठा दरोडा, ‘इतकं’ तोळं सोनं केलं लंपास अन्…

हेही वाचा – “लाखो लोकांची दिशाभूल…”, अयोध्येतील निकालाबद्दलच्या ‘त्या’ पोस्टवरून भडकला सोनू निगम, म्हणाला…

दरम्यान, अदिती सारंगधरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तिचं रंगभूमीवर ‘मास्टर माईंड’ नावाचं नाटक जोरदार सुरू आहे. विजय केंकर दिग्दर्शित या नाटकात अदितीबरोबर अभिनेता आस्ताद काळे काम करत आहे. याशिवाय अदितीचा ‘बाई गं’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लंडनमध्ये चित्रीकरण झालेल्या या चित्रपटात अदितीसह अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे आणि स्वप्नील जोशी अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. पांडूरंग कुष्णा जाधव दिग्दर्शित ‘बाई गं’ चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader