गरोदरपणात नऊ महिने वेगवेगळ्या गोष्टींचे डोहाळे लागतात. कोणाला गोड, आंबट खाण्याची इच्छा होते, तर कोणाला तिखट पदार्थ सतत खावेस वाटतात. माती, खडू अगदी कशाचेही डोहाळे गरोदरपणात लागतात. असंच काहीस एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबरोबर घडलं आहे. या अभिनेत्रीला गरोदरपणात चक्क बिअरचे डोहाळे लागले होते. याबाबत तिनं एका मुलाखतीमधून खुलासा केला आहे.
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अदिती सारंगधर हिला बिअरचे डोहाळे लागले होते. ‘आरपार’ या युट्यूब चॅनलला अदितीने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिनं गरोदरपणात लागलेल्या डोहाळ्यांविषयी सांगितलं.
हेही वाचा – Video: संतोष जुवेकरची मराठी मालिकाविश्वात पुन्हा दमदार एन्ट्री, झळकणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत
अदिती सारंगधर म्हणाली, “गरोदर असताना सुरुवातीला मी खूप उत्साही होते. मला बिअरचे डोहाळे लागले होते. मी गरोदरपणात बिअर प्यायचे. मी या काळात भारतीय पदार्थ खाल्ले नाहीत. मी सॅलेड आणि बिअर एवढंच प्यायचे. मी डॉक्टरांना विचारलं, काय करू? बिअर नाही प्यायले तर मला कसं तरी व्हायचं. मला राग यायचा. मग त्या (डॉक्टर) म्हणाल्या, दोन-दोन घोट प्या. मग मी नऊ महिने बिअर दोन-दोन, तीन-तीन घोट प्यायचे. खरंच बोलतेय, खोटं नाही. मी भात आणि फोडणीचे वगैरे पदार्थ आले ना तर त्या पदार्थामधील एक-एक मोहरी काढून बाजूला करायचे. घरभर १००-२००-३०० मोहऱ्या पडलेल्या असायच्या. त्यामुळे गरोदरपणात भारतीय पदार्थ बंद केले. सॅलेड आणि बिअर एवढंच.”
हेही वाचा – अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेच्या घरावर मोठा दरोडा, ‘इतकं’ तोळं सोनं केलं लंपास अन्…
हेही वाचा – “लाखो लोकांची दिशाभूल…”, अयोध्येतील निकालाबद्दलच्या ‘त्या’ पोस्टवरून भडकला सोनू निगम, म्हणाला…
दरम्यान, अदिती सारंगधरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तिचं रंगभूमीवर ‘मास्टर माईंड’ नावाचं नाटक जोरदार सुरू आहे. विजय केंकर दिग्दर्शित या नाटकात अदितीबरोबर अभिनेता आस्ताद काळे काम करत आहे. याशिवाय अदितीचा ‘बाई गं’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लंडनमध्ये चित्रीकरण झालेल्या या चित्रपटात अदितीसह अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे आणि स्वप्नील जोशी अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. पांडूरंग कुष्णा जाधव दिग्दर्शित ‘बाई गं’ चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd