२०२४ या वर्षाला निरोप देऊन २०२५ या नवीन वर्षाचं स्वागत झालं आहे. संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात केलं जात आहे. सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसंच अनेकजण नवीन वर्षात नवं ध्येय, संकल्प करत आहेत. कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनीदेखील आपल्या चाहत्यांना अनोख्या अंदाजात नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

९०च्या दशकातील मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. ही जोडी आजकाल खूप चर्चेत असते. दोघं सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांच्या मनोरंजनसाठी शेअर करत असतात. पण यामुळे ते कधीकधी ट्रोलही होतात. मात्र याला दोघंही सडेतोड उत्तर देतात. नुकताच ऐश्वर्या नारकर यांनी दोघांचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
shashank ketkar will become father for second time
शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा होणार! नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिली गुडन्यूज, पत्नी व मुलासह केलं खास फोटोशूट
asha bhosle sings trending gulabi sadi song
Video : गुलाबी साडी…; ९१ व्या वर्षी आशा भोसलेंचा जबरदस्त अंदाज! हुकस्टेप करत गायलं संजू राठोडचं ट्रेडिंग गाणं
sonu bhide aka Jheel Mehta wedding video
‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू भिडे’ अडकली लग्नबंधनात, बाबाची भूमिका करणारा मंदार चांदवडकर माफी मागत म्हणाला…
tharla tar mag fame sayali kusum and madhubhau dances on bollywood song
फिर भी ना मिला सजना…; ‘ठरलं तर मग’ फेम सायली, कुसुम अन् मधुभाऊंचा जबरदस्त डान्स! ‘ते’ गाणं ऐकून नेटकरी म्हणाले…
Brides parents dances on Oo Antava song from pushpa on daughter wedding video viral on social media
‘उ अंटवा’ गाण्यावर थिरकले नवरीचे आई-बाबा, लेकीच्या लग्नात केला जबरदस्त डान्स, पाहा VIDEO
Viral video of groom ukhana at wedding navardevacha ukhana viral on social media
“मुलगी काळी…”, नवरदेवाने घेतला जगात भारी उखाणा, VIDEO पाहून कराल कौतुक

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या घरात आले ज्योतिषी, सदस्यांना दिली हटके नावं, वाचा टॉप-१०ची भविष्यवाणी

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी डान्स व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा…हे वर्ष तुम्हाला आनंदाचे आणि यशाचे जावो. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ‘पुष्पा २’ चित्रपटातील सुपरहिट गाणं ‘पीलिंग्स’वर डान्स करताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे दोघांनी भन्नाट डान्स केला आहे. त्यामुळे दोघांच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेचा ‘नटरंग उभा’ गाण्यावरील सुंदर नृत्याविष्कार पाहिलात का? नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

अभिनेत्री तितीक्षा तावडे, रुपल नंद, भक्ती रत्नपारखी, सिद्धार्थ बोडके यांच्यासह चाहत्यांनी प्रतिक्रिया देत ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांच्या हा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: मुनव्वर फारुकीने रजत दलाल-करणवीर मेहराची उडवली खिल्ली, पाहा नवा प्रोमो

दरम्यान, ऐश्वर्या आणि अविनाश नारकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच ऐश्वर्या यांची लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत त्यांनी साकारलेली खलनायिका चांगलीच गाजली. तसंच अविनाश नारकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेत त्यांनी विक्रमादित्य देशमुखची भूमिका साकारली आहे. याशिवाय त्यांचं ‘पुरुष’ नावाचं नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष ५० प्रयोग या नाटकाचे होणार आहेत.

Story img Loader