Aishwarya Narkar And Ashwini Kasar Dance Video: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यामुळे त्या कामा व्यतिरिक्त सुंदर डान्स व्हिडीओ आणि फोटोंमुळे नेहमी चर्चेत असतात. आता त्यांच्या डान्स व्हिडीओचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. पण, अनेकदा त्या डान्स व्हिडीओमुळे ट्रोलही होतात. पण त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतात. नुकताच ऐश्वर्या नारकर यांनी सुंदर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या अभिनेत्री अश्विनी कासारबरोबर डान्स करताना दिसत आहेत. दोघींनी रणबीर कपूरच्या ‘कुन फाया कुन’ लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे. ऐश्वर्या नारकर आणि अश्विनी कासार यांच्या डान्ससह हावभावाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. दोघींच्या सुंदर डान्सचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा – Bigg Boss 18: करणवीर मेहराने रिलेशनशिपवरून चाहत पांडेला डिवचलं, अभिनेत्रीने रागाच्या भरात केलं ‘हे’ कृत्य
ऐश्वर्या नारकर आणि अश्विनी कासार यांचा डान्स चाहत्यांना खूपच आवडला आहे. लाइक्स आणि प्रतिक्रियेच्या माध्यमातून चाहत्यांनी दोघींचं कौतुक केलं आहे. आतापर्यंत ऐश्वर्या आणि अश्विनी कासारच्या या डान्स व्हिडीओला १८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही वाचा – Bigg Boss 18: “हीच तोंडपण बघायचं नाही…”, घराबाहेर येताच कशिश कपूरची शिल्पा शिरोडकरवर टीका, म्हणाली…
दरम्यान, ऐश्वर्या नारकर आणि अश्विनी कासार कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच ऐश्वर्या यांची लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत त्यांनी साकारलेली खलनायिका चांगलीच गाजली.
तसंच अश्विनी कासारची ‘सावित्रीजोती’ ही लोकप्रिय मालिका पुनः प्रसारित झाली आहे. ६ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता ही मालिका ‘सोनी मराठी’ वाहिनीवर प्रसारित होत आहे. या मालिकेत अश्विनीने सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारली आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी अश्विनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात पाहायला मिळाली होती. तसंच तिचं ‘नाट्यचौफुला’ नाटक रंगभूमीवर सुरू आहे.