नव्वदच्या दशकापासून मराठी सिने व नाट्यसृष्टीत अविरत काम करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाबरोबर सौंदर्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. चाळीशीतल्या असूनही अजूनही त्याचं सौंदर्य व एनर्जी हे तरुणाईला लाजेवल असं आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्री सध्या कामासह सोशल मीडियावर पोस्टमुळे अधिक चर्चेत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सुंदर फोटो, व्हिडीओ शेअर करण्याबरोबरचं आपलं परखड मत व्यक्त करत असतात. तसंच ट्रोल केलं तर त्यांना सडेतोड उत्तर देताना ऐश्वर्या नारकर पाहायला मिळतात. शिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरील ट्रेंड खूप फॉलो करत असतात. सोशल मीडियावर ट्रेंड होतं असलेल्या गाण्यांवर जबरदस्त डान्स करताना दिसतात. अविनाश नारकरांबरोबर त्यांचे अनेक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल झाले असून त्याला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. अलीकडेच ऐश्वर्या नारकरांची एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर चाहत्याने त्यांना ब्रेकअपविषयी विचारलं. यावर अभिनेत्री काय म्हणाल्या? जाणून घ्या…

हेही वाचा – ‘स्टार प्रवाह’ लवकरच सुरू होतोय ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ कार्यक्रम, परीक्षक व सूत्रसंचलनाची धुरा सांभाळणार ‘हे’ कलाकार

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी जोडवी घातलेल्या सुंदर पायांचा व्हिडीओ करत त्यावर चारोळी लिहिली होती. “माझ्या प्रत्येक क्षणात, तुझा वाटा अर्धा आहे. भूतकाळ आठवयचाच तर, तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे…” ही चंद्रशेखर गोखले यांची चारोळी ऐश्वर्या यांनी त्या व्हिडीओवर लिहिली आहे. तसंच या व्हिडीओला अरुण दाते आणि मिलिंद इगळे यांचं ‘दिस नकळत जाई’ हे गाणं लावलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्या नारकरांची कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “चारोळ्या…..तुम्हाला काही आठवतायत का?”

ऐश्वर्या नारकरांच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ऐश्वर्या यांना तुमचा ब्रेकअप झाला होता? असं विचारलं आहे. एका चाहत्याने प्रतिक्रिया देत विचारलं आहे, “मॅम तुमचा ब्रेकअप झाला होता का कधी? असं मला वाटतंय. सहज विचार आला म्हणून विचारलं.” या चाहत्याच्या प्रतिक्रियेला उत्तर देत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “नाही नाही” आणि पुढे हसण्याचे इमोजी दिले.

ऐश्वर्या नारकरांचं चाहत्याला उत्तर

हेही वाचा – प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने गायलं आहे कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’चं ‘जमूरे’ गाणं! याआधी अजय देवगणच्या चित्रपटात केलेलं काम

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत त्यांनी अद्वैत म्हणजेच अभिनेता अजिंक्य ननावरेची आई रुपाली म्हात्रेची (विरोचक) भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या नारकरांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. आता या भूमिकेद्वारे त्यांना ओळखलं जात आहे.