आजकाल कलाकार मंडळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या आगामी कामाविषयी चाहत्यांना माहिती देत असतात. शिवाय आजूबाजूच्या घडामोडींविषयी देखील परखड भाष्य करत असतात. सध्या मराठी सिनेसृष्टीतील सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कायम मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ, फोटो शेअर करत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच ऐश्वर्या नारकरांनी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेतलं. या सेशनमध्ये चाहत्यांनी ऐश्वर्या नारकरांना भरभरून प्रश्न विचारले. कोणी त्यांना कामाविषयी विचारलं, तर कोणी त्यांना वैयक्तिक आवडी-निवडीविषयी विचारलं. एका चाहत्याने विचारलं की, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका संपते आहे, असं ऐकलं. मग पुढे कोणता प्रोजेक्ट? मालिका, नाटक, चित्रपट? या प्रश्नाच उत्तर देत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “अजून निश्चित झालेलं नाही.”

हेही वाचा – एका चाहत्याने ऐश्वर्या नारकरांना विचारलं डिनरसाठी, अभिनेत्रीने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…

ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्राम स्टोरी

तसंच दुसऱ्या चाहत्याने लाइव्ह लोकेशन विचारलं. त्यावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “कुठल्या भागाचं पाठवू?” तर तिसऱ्या चाहत्याने विचारलं की, तुम्ही पुण्याला राहता की मुंबईत. तेव्हा ऐश्वर्या म्हणाल्या, “मुंबई.” चौथ्या चाहत्याने विचारलं की, तुमच्या कपाळावर काय झालंय. त्यावर अभिनेत्री म्हणाल्या, “जन्मखूण.”

ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्राम स्टोरी
ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्राम स्टोरी
ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्राम स्टोरी

ऐश्वर्या नारकरांच्या एका चाहत्याने त्यांना थेट त्यांचं वजन किती आहे? असं विचारलं. यावर त्यांनी भन्नाट उत्तर दिलं. ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “समाजात भारी वजन.” त्यानंतर हसण्याचा इमोजी दिला आहे.

ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरचा येणार नवा चित्रपट, चित्रीकरणासाठी पोहोचला ‘या’ देशात

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मध्ये पाहायला मिळत आहेत. पण त्या आता रुपाली म्हात्रे नाहीतर मैथिली सेनगुप्ताच्या भूमिकेत दिसत आहेत.

हेही वाचा – Video: गंगा आरतीत तल्लीन झाली परिणीती चोप्रा, राघव चड्ढाही होते सोबतीला, पाहा व्हिडीओ

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेला दोन वर्ष पूर्ण झाली असून सध्या दुसरं पर्व सुरू आहे. पहिल्या पर्वात ऐश्वर्या यांनी अद्वैतची आई रुपालीची भूमिका साकारली होती. त्यानंतर दुसऱ्या पर्वात ऐश्वर्या नव्या भूमिकेत झळकल्या. यात त्यांनी डॉ. मैथिली सेनगुप्ता भूमिका साकारली आहे. या मैथिली सेनागुप्तामध्येच शतग्रीव नावाच्या असूराने प्रवेश करून विरोचकाच्या वधाचा बदला घेण्यासाठी शतग्रीव कोलकातातून महाराष्ट्रात आल्याच दाखवलं. त्यानंतर नेत्राच्या घरी पोहोचून मैथिलीने आता तिच्याशी जवळीक साधली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress aishwarya narkar fan asks her weight pps