एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखले जाणारे अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांची जोडी नेहमी चर्चेत असते. अभिनयाबरोबर ही जोडी सोशल मीडियावरील पोस्टमुळेही सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. दोघं वेगवेगळ्या कलाकारांबरोबर रील्स करताना दिसतात. नुकताच दोघांनी मिळून तमन्ना भाटियाच्या ट्रेंडिंग ‘कावाला’ गाण्यावर रील केले होते, जे चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी एका कोळी गाण्यावरील रील पोस्ट केले. ज्यावरील एका नेटकऱ्याच्या खोचक कमेंटवर ऐश्वर्या यांनी चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी काल (२६ जुलै) ‘मी हाय कोली सोरील्या होरी’ या कोळी गाण्यावरील रील पोस्ट केले. ज्यामध्ये त्या एका व्यक्तीबरोबर नाचताना दिसत आहेत. हे रील पोस्ट करत ऐश्वर्या यांनी लिहिलं आहे की, “शाळेचे दिवस आठवले.”

या रीलमधील ऐश्वर्या यांचा डान्स पाहून काही नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केलं आहे. पण एका नेटकऱ्यानं अशी काही कमेंट केली, ज्याला अभिनेत्रीनं चांगलंच सडेतोड उत्तर दिलं. त्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “छान संस्कृती आहे मॅडम. नवरा दुसऱ्या मुलींसोबत नाचतो आणि तुम्ही दुसऱ्या मुलांसोबत नाचता; विदेशी संस्कृतीचं अंधानुकरण म्हणतात याला.”

हेही वाचा – Video: अभिनेत्री तेजश्री प्रधानने चाहत्यांसाठी दिली खुशखबर, लवकरच….

या कमेंटवर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या की, “तुमच्या बुध्यांकाचं काय बरं करावं?” यावर त्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “माझ्या बुध्यांकाची काळजी करण्यापेक्षा थोडं भारतीय संस्कृतीप्रमाणे वागा.” त्यावर ऐश्वर्या म्हणाल्या की, “ते आधी तुम्ही जाणून घ्या…”

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील सुनील बर्वे दिसणार आता ‘या’ भूमिकेत; म्हणाले, “स्ट्रगलचा उपयोग होतोय आता….”

यामध्ये एका नेटकरीनं मध्यस्थी करत लिहिलं की, “तुम्हाला बघायला आवडतंय ना विदेशीच… नाहीतर तुम्ही इथे नसता.” या कमेंटवर तो नेटकरी म्हणाला की, “मी फक्त सल्ला दिला आहे, त्यात तुम्ही कशाला तोंड घालता.” मग ऐश्वर्या नारकरांनी स्पष्टचं लिहिलं की, “विचारलाय कोणी सल्ला? कळण्यापलीकडचं आहे.. जाऊदे…”

हेही वाचा – “स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल तोंडातून ब्र न काढणारे…”, मराठी अभिनेत्याने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, “OTT वरील काल्पनिक…”

यानंतर अभिनेत्रीनं त्या नेटकऱ्याच्या कमेंटला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. इतर नेटकरी ऐश्वर्या यांना लक्ष देऊ नका असे सल्ले देऊ लागले. दरम्यान, सध्या ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत दिसत आहेत. या मालिकेत अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका त्यांनी साकारली आहे.

Story img Loader