९०च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या त्या काळात जितक्या लोकप्रिय होत्या तितक्याच आजही आहेत. मालिका, चित्रपट, नाटक, वेब सीरिज या चारही क्षेत्रात काम करून त्यांनी या सिनेसृष्टीत एक वेगळी छाप उमटवली आहे. अशा या चिरतरुण अभिनेत्रीने नातं पुनर्जीवित करण्यासाठी एक मोलाचा सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नव्या घराचं डाउन पेमेंट व EMIसाठी केतकी माटेगावकरने ‘अशी’ केली काटकसर, म्हणाली…

नुकताच ऐश्वर्या नारकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. शिवाय त्यांनी एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे. व्हिडीओत ऐश्वर्या म्हणतात की, शुभ दसरा. दसऱ्यासाठी तयार होत होते आणि जाणवलं की, डोळे अगदीच निस्तेज दिसतायत. थोडसं काजळ लावलं तर छान दिसतील. काहीतरी फरक पडेल. काजळ लावता लावता जाणवलं की, छोट्याशा गोष्टी असतात पण त्या सगळं रुपचं बदलून टाकतात. तसंच आपलं नात्याचं सुद्धा आहे. बऱ्याच वेळा आपली नाती काळानुसार निर्जीव व्हायला लागतात, त्याच्यातली गंमत निघून जाते. पण त्याच्यात छोटस काहीतरी अ‍ॅड केलं ना, तर खरंच ती नाती पुनर्जीवित होतात. मग ते एकमेकांबद्दलच प्रेम असेल, एकमेकांसाठी दिलेला वेळ असेल किंवा एकत्र केलेली काहीतरी गंमत मज्जा-मस्ती असेल. यामुळे नातं पुनर्जीवित होतं. मग आयुष्याची खरी मज्जा यायला लागते, असं मला वाटतं. बघा एकदा करून.

हेही वाचा – “तुझ्या सौंदर्याचं रहस्य काय आहे?” चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देत ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू म्हणाली…

हेही वाचा – Video: अशोक शिंदे यांचं डाएट ऐकून भाऊ कदम यांनी घेतला ‘हा’ निर्णय; पाहा व्हिडीओ

ऐश्वर्या नारकर यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यामुळे चाहते या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तसेच चाहत्यांबरोबर कलाकार मंडळी देखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – “…अन् डोळे पाणावले” ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने शेअर केला विमानप्रवासातील अनुभव, म्हणाली, “आश्चर्यकारक…”

दरम्यान, ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्या सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress aishwarya narkar share new video pps