लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली ही भूमिका साकारत आहेत. या मालिकेत त्यांची भूमिका खलनायिकेची आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्या फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात.
ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांच्याबरोबर त्यांचे आई-वडीलही दिसत आहेत. ‘तुझ्या उपकारा जगी तोड नाही, आई-बाबा’ असं त्यांनी या व्हिडीओवर लिहिलं आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या व त्यांचे आई-वडील एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे.
एव्हरग्रीन ऐश्वर्या नारकर ५३ वर्षांच्या आहेत. पण त्या खूप उत्साही आहेत, त्या त्यांच्या दिनचर्येचे अनेक फोटो व व्हिडीओ दररोज चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. इतकंच नाही तर त्यांचे ट्रेंडी रील्सही लक्ष वेधून घेतात.
दरम्यान, ऐश्वर्या नारकरांनी पालकांबरोबरचा हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यावर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत ऐश्वर्या यांच्या आई-वडिलांना नमस्कार केला आहे. तर अनेकांनी रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. ऐश्वर्या यांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.