ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. मराठी इंडस्ट्रीतील सहाबहार जोडी म्हणून त्यांना ओळखलं जातं. अलीकडे दोघेही ट्रेडिंग गाण्यावर रिल्स करताना दिसतात. नारकर जोडप्याचे रिल्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असले तरी, अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक युजर्सनी त्यांच्या व्हिडीओवर ‘तुमचं वय झालंय’, ‘तुम्हाला हे शोभतं का?’, ‘म्हातारचळ’ अशा असंख्य कमेंट्स केल्या होत्या. या ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी ऐश्वर्या नारकर यांनी ‘मुघल ए आझम’ चित्रपटामधील गाण्यावर नवा व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : “अशी खलनायिका…”, ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेत शालिनी करणार जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स, नेटकरी म्हणाले…

सध्या इन्स्टाग्रामवर ‘मुघल ए आझम’ चित्रपटामधील ‘तेरी मेहफिल’ या गाण्यातील ‘किसी दिन ये तमाशा मुस्कुराकर हम भी देखेंगे’ ही ओळ प्रचंड व्हायरल होत आहे. याच गाण्यावर व्हिडीओ बनवून ऐश्वर्या नारकर यांनी ट्रोलर्सला सुनावलं आहे. “तुमचं वय झालंय, तुम्ही हे काय करताय? असं सांगणाऱ्यांना या गाण्याची ओळ बरोबर लागू होते.” असं ऐश्वर्या यांनी या व्हिडीओवर लिहिलं आहे. अर्थात जेव्हा तुमचं वय होईल तेव्हा तुम्हाला सुद्धा याच गोष्टी बोलल्या जातील असं या व्हिडीओद्वारे अभिनेत्रीला सांगायचं आहे.

हेही वाचा : “त्यांच्या शेजारी उभं राहण्याची…”, ‘बिग बीं’च्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने शेअर केला Unseen फोटो

गेल्या काही दिवसांमध्ये ट्रोलर्स नारकर जोडप्याला त्यांच्या वयावरून ट्रोल करत आहेत. त्यांना स्पष्ट उत्तर देत ऐश्वर्या लिहितात, “तुमचं वय हा फक्त एक आकडा असतो. त्यामुळे आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण जगून घ्या. तुमचा जन्म आयुष्याचा आनंद घेण्यासाठी झाला असल्याने कायम सकारात्मक राहा.”

हेही वाचा : “सुखाचा प्रवास कसा होईल?” वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नम्रता संभेरावची संतप्त पोस्ट; म्हणाली…

अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. “तुम्ही दोघे तरूण आहात… खरंच, तुमच्या फिटनेससमोर वय हा फक्त आकडा आहे”, “तुमचं वय झालंय असं अजिबात वाटत नाही”, “ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करा”, अशा असंख्य कमेंट्स त्यांच्या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या अविनाश नारकर ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांची भूमिका साकारत आहेत. तसेच ऐश्वर्या नारकर या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress aishwarya narkar slams trollers shared recent video on mughal e azam movie iconic song sva 00