प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मराठी मालिकांमध्ये सतत नवनवीन ट्विस्ट येत असतात. तसेच मालिकांमध्ये नव्या कलाकारांचीही एन्ट्री होत असते. असाच काही प्रकार आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता हार्दिक जोशीची एन्ट्री झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा – “माझ्या पदरात…” अभिनेता संतोष जुवेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाला, “बाप्पा…”
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा अर्थात हार्दिक आता ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये झळकला आहे. शुभंकर ठाकूर या भूमिकेत हार्दिक पाहायला मिळतं आहे. मोनिकाबरोबर या शुभंकरचं खास नातं आहे. आता ते नातं नेमकं काय आहे? हे मालिकेच्या येत्या भागांमधून उलगडणार आहे. पण हार्दिकच्या एन्ट्रीमुळे मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. पण ही लोकप्रिय मालिका हार्दिकला मिळाल्यानंतर पत्नी अक्षया देवधरची पहिली रिअॅक्शन काय होती? याबाबत त्यानं स्वतः सांगितलं आहे.
‘अल्ट्रा मराठी बज’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी बोलताना हार्दिकनं पत्नी अक्षयाची पहिली रिअॅक्शन काय होती? याबाबत सांगितलं. तो म्हणाला की, “सध्या ती मालिका खूप बघतेय. त्यामुळे मी जेव्हा तिला सांगितलं की, मला ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत काम मिळतं आहे. तेव्हा ती म्हणाली की, अरे, लगेच कर. त्यात अभि (अभिजीत खांडकेकर) आहे. त्यामुळे काही प्रोब्लेम नाही. जा बिनधास्त कर.”
हेही वाचा – नम्रता संभेरावनं दाखवली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील रिहर्सल, म्हणाली….
पुढे हार्दिक म्हणाला, “ती (अक्षया) पण एक कलाकार आहे. त्यामुळे ती जास्त सांगू शकते. आणि आता ती कलाकार प्लस प्रेक्षकही आहे. त्यामुळे तिनं मला सांगितलं, मालिका येतेय तर तू करच आणि मालिका सोडू नकोस. शिवाय माझं पण एक मत असं आहे की, ज्या क्षेत्रातून आपण वर आलेलो असतो, ते क्षेत्र कधीच सोडायचं नसतं. मालिका हे क्षेत्र माझ्या हृदयाच्या जवळच आहे. त्यामुळे मी मालिका करतंच राहीन.”