‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या पाठकबाई गेल्याच महिन्यात राणादासह लग्नबंधनात अडकल्या आहेत. अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नाची क्रेझ अनेक दिवस होती. लग्नानंतर कित्येक दिवस त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट व वैयक्तिक आयुष्याबाबतही ती अनेकदा सोशल मीडियावर फोटो, पोस्ट शेअर करताना दिसते. अक्षयाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला होता. मुंबईच्या ट्राफिकमध्ये गाडी अडकल्याचं तिच्या फोटोमध्ये दिसत होतं. शेंगदाण्याची पुडी अक्षयाने हातात घेतल्याचं दिसत आहे.

हेही वाचा>> “सनी लिओनी…”, हटके पोझमध्ये फोटोशूट केल्यामुळे सई ताम्हणकर ट्रोल

हेही वाचा>> अखेर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका होणार बंद! ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

अक्षयाने या फोटोमधून मुंबईच्या वाहतूक कोडींवर भाष्य केलं आहे. तिने या फोटोला दिलेल्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे. “मुंबईच्या ट्राफिकमध्ये शेंगदाणे विकू लागलेत आता…आनंदी व्हायचं की दु:खी?” असं अक्षयाने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हेही पाहा>> Birthday Special: गौरव मोरेला केसांमुळे मिळालेली गुगलची जाहिरात; स्वत:च सांगितलेला किस्सा

अक्षया देवधर व हार्दिक जोशीने २ डिसेंबरला लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. राणादा-पाठकबाई ही रील लाइफ जोडी खऱ्या आयुष्यातही विवाहबद्ध झाल्याने चाहतेही आनंदी होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress akshaya deodhar on mumbai traffic shared photo kak