छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया गुरवने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळवलेली मराठमोळी अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षयाने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचे शर्ट घातलं आहे. मेसी बन आणि साजेसा मेकअप करत अक्षयाने ग्लॅमरस लूक केल्याचं दिसत आहे. अक्षयाने शर्टचं बटण उघड ठेवत फोटोशूटसाठी हॉट पोझ दिली आहे. परंतु, अक्षयाचा हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं नसल्याचं दिसत आहे.

हेही वाचा>> लावणी कार्यक्रमांवर बंदीची चर्चा सुरू असतानाच गौतमी पाटीलचा मोठा निर्णय; म्हणाली, “२०२३च्या पहिल्याच दिवशी…”

हेही वाचा>> “तेच, असे किती आले आणि गेले…”, मानसी नाईकच्या पोस्टने वेधलं लक्ष

मराठमोळ्या अक्षयाने केलेल्या या बोल्ड फोटोशूटमुळे चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर संतप्त कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत “तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. जेव्हा कलाकरांना काम मिळत नाही, तेव्हा ते शरीर प्रदर्शन करुन चर्चेत येण्याचा व काम मिळवण्याचा प्रयत्न करतात”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “अक्षया शरीर प्रदर्शन ही फॅशन नसून विकृती आहे. जी समाजाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. त्यात आज तुही योगदान दिलं आहेस”, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा>> Video:…अन् नातवांसाठी मुकेश अंबानी झाले ड्रायव्हर; ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांचीही व्हिडीओत दिसली झलक

अक्षयाने केलेल्या बोल्ड फोटोशूट चाहते नाराज आहेत. फॉलोवर्स वाढवण्यासाठी असं फोटोशूट केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. तर कित्येकांनी अक्षयाच्या या फोटोवर कमेंट करत तिला अनफॉलो करणार असल्याचंही म्हटलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress akshaya gurav troll for bold photoshoot netizens react kak