‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक सध्या चर्चेत आली आहे. चर्चेच कारण आहे ट्रोलिंग. लठ्ठपणावरून सतत ट्रोल करणाऱ्या एका व्यक्तीला तिने सोशल मीडियाद्वारे सडेतोड उत्तर दिलं आहे. अक्षयाची ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री अक्षया नाईकला ट्रोल करणारी व्यक्ती सतत तिच्या पोस्टवर लठ्ठपणावरून प्रतिक्रिया करत होती. एवढंच नव्हेतर या व्यक्तीनं प्रतिक्रियेत अक्षयाच्या कुटुंबियातील सदस्यांचा देखील उल्लेख केला. यामुळे अक्षया संतापली. तिने थेट सोशल मीडियावर संतप्त भावना व्यक्त करत मुंबई पोलिसांना पोस्ट टॅग केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने केलेल्या कमेंटचे स्क्रीनशॉर्ट आणि अकाउंटची माहिती दिली आहे.

हेही वाचा – Video: महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट प्रेमकथा ‘या’ तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीस, ‘लय आवडतेस तू मला’ नव्या मालिकेची वेळ जाणून घ्या…

अक्षया नाईक पोस्ट करत म्हणाली, “मी खूप भाग्यवान आहे की मी सोशल मीडियावर बॉडी शेमिंग / ट्रोलिंगचा सामना केला नाही. कधीतरी, होय नक्कीच; पण मी अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यांना इतकं महत्त्व द्यावं असं कधी वाटलं नव्हतं. पण यावेळी मला त्या व्यक्तीला बोलावेसे वाटते कारण टिपण्या / बॉडी शेमिंगमध्ये माझ्या कुटुंबातील सदस्यांचाही उल्लेख आहे. आणि हे मी सहन करू शकत नाही.”

पुढे अभिनेत्री म्हणाली, “तसंच, ही व्यक्ती इतकी रिकामटेकडी आहे की ते २०१९मध्ये अपलोड केलेल्या पोस्ट खोदून कमेंट करत आहेत. आणि त्या अकाउंटवर त्यांचे कोणतेही फॉलोअर्स किंवा पोस्ट नाहीत. हे हेट अकाउंट खास माझ्यासाठी बनवलं आहे, असं दिसतं…बरं हे त्यांचं अकाउंट आहे. जमल्यास रिपोर्ट/ स्पॅम / रिपोर्ट ब्लॉक करा. @vikashsagwan208 पुढे त्यांच्या कमेंटचे स्क्रीनशॉट अपलोड करत आहे.”

हेही वाचा – “तुमची तोंडं कोण बघणार…”, अभिजीत बिचुकलेंनी ७० दिवसांत ‘बिग बॉस’ संपवण्याबद्दल लगावला टोला, म्हणाले, “घमंड, उद्धटपणा…”

Akshaya Naik Post
Akshaya Naik Post

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस’च्या घरात दोन अभिजीतमध्ये रंगली गाण्याची जुगलबंदी; नेटकरी म्हणाले, “बिचुकले चुकून…”

दरम्यान, अक्षया नाईकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेनंतर तिचं ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या नाटकात तिच्याबरोबर ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील अभिनेता अक्षय मुडावदकर पाहायला मिळाला. त्यानंतर सुपरहिट झालेल्या ‘नाच गो बया’ या म्युझिक व्हिडीओमध्ये अक्षया झळकली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress akshaya naik answer to trolls who body shaming pps