केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट ३० मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक होते. या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली. ‘महाराष्ट्र शाहीर’मधील गाणीही प्रचंड व्हायरल होत आहेच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील बहरला हा मधुमास गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. या गाण्यावरील अनेक रील्स व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही या गाण्यावर डान्स करत रील बनवला आहे. आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया नाईक हिलाही बहरला हा मधुमास गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही.

हेही वाचा>> “मी, राज ठाकरे आणि ती…”, अवधूत गुप्तेच्या पोस्टने वेधलं लक्ष

अक्षयाने बहरला हा मधुमास गाण्यावर तिची आई व बहिणीसह डान्स केला आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयाच्या आईचा वाढदिवस होता. या खास दिवशी अक्षयाने बहरला हा मधुमास गाण्यावरील हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अक्षया आई व बहिणीसह बहरला हा मधुमास गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे अडकला विवाहबंधनात, पत्नीबरोबरचे फोटो व्हायरल

अक्षयाने मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत ती दिसली होती. सध्या ती ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress akshaya naik dance on baharala ha madhumaas with mother and sister video viral kak