‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादेला ओळखले जाते. बिग बॉसमुळे ते दोघेही घराघरात पोहोचले. काही महिन्यापूर्वी त्या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. त्यानंतर आता त्या दोघांचं पहिलं केळवण पार पडलं आहे. नुकतंच तिने याचे फोटो शेअर केले आहेत.
अमृता देशमुख ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. नुकतंच अमृताने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात ती आणि प्रसाद जवादे पाहायला मिळत आहे. यावेळी अमृताने सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे. त्याबरोबरच तिने साजेसी ज्वेलरीही परिधान केली आहे. तर प्रसादने गोल्डन रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
आणखी वाचा : अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने गुपचूप उरकला साखरपुडा, लग्नाची तारीख सांगत म्हणाले “आता आमच्या मार्गात…”
या फोटोला कॅप्शन देताना अमृताने हटके कॅप्शन दिले आहे. “पहिल्या केळवणासाठी तयार…”, असे कॅप्शन अमृताने दिले आहे. त्याबरोबरच त्याने प्रसाद जवादेला टॅग केले आहे.
आणखी वाचा : स्वानंदी टिकेकरकडून साखरपुड्याची गुडन्यूज, मेहंदीचा पहिला फोटो समोर, म्हणाली “आम्हाला…”
दरम्यान अमृता आणि प्रसादने काही महिन्यांपूर्वी गुपचूप साखरपुडा उरकला होता. अमृताने साखरपुड्याचे फोटो शेअर करताना त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. येत्या १८ नोव्हेंबरला अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकणार आहेत. ‘बिग बॉस’च्या जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून दोघांचेही चाहते सध्या आनंद व्यक्त करत आहेत.