‘सोनी मराठी’ वाहिनीवर लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं नुकतंच नवं पर्व सुरू झालं. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात चाहता वर्ग असलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. नुकत्याच सुरू झालेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वात हरहुन्नरी अभिनेत्री झळकणार आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून अमृता देशमुख आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये अमृता देशमुखने आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र्य स्थान निर्माण केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात अमृताने जबरदस्त खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली. अमृता अभिनयाबरोबर उत्कृष्ट आरजे आहे. ‘पुण्याची टॉकरवडी’ म्हणून तिला ओळखलं जातं. आता हीच टॉकरवडी खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वात अमृता पाहायला मिळणार आहे. तिचं हास्यजत्रेच्या कलाकारांनी कसं स्वागत केलं? जाणून घ्या…

हेही वाचा – “तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर

अभिनेत्री अमृता देशमुखने नुकताच ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अमृताला हास्यजत्रेतील कलाकारांनी तुझं स्वागत कसं केलं? असं विचारलं. तेव्हा ती म्हणाली, “माझ्या रुमच्या इथे ईशा डे होती, प्रियदर्शिनी इंदलकर होती अजून दोघी-तिघी होत्या. ओंकार राऊत सुद्धा तिथे होता. इथल्या एका क्रू मेंबरपैकी एकाने मला सांगितलं की, मॅम, तुमच्यासाठी सरप्राइज आहे. मग माझी एन्ट्री वगैरे झाली. तेव्हा सगळ्याजणी ओरडून हाय वगैरे करून लागल्या. पण ओंकार राऊतने केलं नाही.”

हेही वाचा – “मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…

“ओंकार राऊतचं असं होतं की, अरे दारावर लिहिलेलं आहे. तर त्यात काय एवढं सरप्राइज? पण, मी म्हटलं फक्त दाखवना; केवढा आनंद झाला. एवढा काय फरक पडतो, अशा प्रकारे माझं स्वागत करण्यात आलं”, असं अमृता देशमुखने सांगितलं.

हेही वाचा – करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर

दरम्यान, अमृता देशमुख कामाव्यतिरिक्त वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे. नेहमी नवरा प्रसाद जवादेबरोबर रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसंच तिच्या ‘नियम व एटी लागू’ या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात अमृतासह अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, प्रसाद बर्वे आहेत. याच नाटकासाठी अमृताला ‘झी नाट्य गौरव’चा सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress amruta deshmukh was welcomed on the sets of maharashtrachi hasyajatra pps