मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि नृत्य कौशल्याने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. सध्या अमृता ‘झी मराठी’ वाहिनीवरील नवा कार्यक्रम ‘ड्रामा ज्युनिअर्स’मुळे सतत चर्चेत असते. या कार्यक्रमात अमृता लहान अतरंगी मुलांचं परीक्षण करताना दिसत आहे. तिच्या सोबतीला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे देखील आहे. दोघं परीक्षकाची भूमिका उत्तमरित्या पेलत आहेत. अशातच अमृता खानविलकरने ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमातील छोट्या पुष्पाबरोबर जबरदस्त डान्स केला; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर अमृता खानविलकर आणि छोटा पुष्पाचा डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या लोकप्रिय गाण्यावर अमृता खानविलकर ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या छोट्या पुष्पाबरोबर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. ‘श्रीवल्ली’ या गाण्यातील अल्लू अर्जुनने केलेली हूकस्टेप दोघं करताना पाहायला मिळत आहे. अमृता व छोट्या पुष्पाचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या लग्नाआधी झाली ग्रह शांती पूजा; पारंपरिक लूकमध्ये दिसली अंबानींची होणारी सून

याआधी अमृता खानविलकरने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेबरोबर केलेला एक मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओत अमृता संकर्षण कऱ्हाडेच्या कविता ऐकून चिडलेली पाहायला मिळाली होती. “कवी मनाचा मित्र जेव्हा सध्याच्या गोष्टींमध्ये पण काव्य शोधतो…काय करावं सांगा?” असं कॅप्शन अभिनेत्रीने त्या व्हिडीओ दिलं होतं.

हेही वाचा – Video: “अरमान मलिकला बाहेर काढा”, विशाल पांडेच्या आई-वडिलांनी भावुक होत ‘बिग बॉस’ला केली विनंती, म्हणाले…

हेही वाचा – Video: विकी कौशलसारखा डान्स करताना पृथ्वीक प्रतापच्या आईनं केलं असं काही…; नेटकरी करतायत कौतुक

दरम्यान, ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रम ‘झी मराठी’ वाहिनीवर २२ जूनपासून सुरू झाला आहे. शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होतो. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे सांभाळत आहे. या कार्यक्रमात लहान मुलांचा उत्कृष्ट असा अभिनय पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress amruta khanvilkar dance with chota pushpa video viral pps