मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्रींपैकी एक म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत आहे. अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचे अनेकदा बोललं जातं. नुकतंच अमृता खानविलकरने याबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिकांमध्ये अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर या दोघांचीही नाव अव्वल स्थानावर आहेत. नुकतंच अमृताने ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी अवधूत गुप्तेने अमृताला सई ताम्हणकरचा फोटो दाखवला आणि तिच्याबद्दल काय वाटतं, असा प्रश्न विचारला.
आणखी वाचा : “असं तर होणारच…” अमृता खानविलकरशी दुरावा निर्माण झाल्याच्या प्रश्नावर सई ताम्हणकरचे स्पष्ट उत्तर

त्यावर अमृता खानविलकर म्हणाली, “सई ताम्हणकर एक अभिनेत्री म्हणून मला खूप आवडते. असं अनेकदा झालं आहे की मी तिची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला. पण मला समोरुन तसा प्रतिसाद मिळाला नाही.”

त्यानंतर अवधूत गुप्तेने “काही भांडण वैगरे झालं होतं का?” असा प्रश्न अमृताला विचारला. त्यावर अमृताने “नाही नाही, अजिबात नाही. आता आपण एका सिनेसृष्टीत काम करतो, पण म्हणून आपण अगदीच सगळ्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतो, असं नाही”, असे म्हटले.

आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

दरम्यान अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर या दोघीही एकमेकांच्या खास मैत्रिणी असल्याचे बोललं जातं. मात्र काही कारणांनी त्यांच्या मैत्रीत फूट पडली. त्यापूर्वी त्या दोघीही एकत्र फिरतानाचे फोटोही समोर आले होते. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्सेही समोर आले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress amruta khanvilkar talk about sai tamhankar friendship recent interview nrp