नाटक हा अनेक कलाकारांचा जिव्हाळ्याचा विषय. मालिका आणि चित्रपट करताना अनेक कलाकार प्रायोगिक असो वा व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाची परीक्षा घेतच असतात. आता पुन्हा एकदा एक अभिनेत्री व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना एक गूढ अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी अभिनेत्री अमृता पवार ही ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करण भोगले निर्मित रत्नाकर मतकरी यांच्या कामगिरी कथेवर आधारित आणि संकेत पाटील दिग्दर्शित ‘२१७ पद्मिनी धाम’ हे नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे. या नाटकात पद्मिनी ही भूमिका अभिनेत्री अमृता पवार साकारणार आहे. हे पात्र या नाटकाचं मध्यवर्ती पात्र आहे. या नाटकाचं कथानक ‘पद्मिनी’ मुळे घडतं. अमृताचं हे पहिलं वहिलं व्यावसायिक नाटक आहे. याआधीही तिने रंगभूमीवर काम केले आहे.
आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…”

रावराजेची एकुलती एक मुलगी पद्मिनी आणि मुरंजन अशा त्रिकुटाभोवती या नाटकाची कथा घडत असते. पद्मिनी साकारण्यासाठी सज्ज असलेली अमृता सध्या या नाटकाची तालीम करत आहे. लवकरच रंगभूमीवर येणार ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकाच संगीत शुभेम ढेकळे करत आहे. तर याचे नेपथ्य संदेश बेंद्रे करत आहेत. तर नाटकांची प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून नाटकाची सूत्र कल्पेश बाविस्कर आणि नितीन नाईक सांभाळत आहे.

“२०१६ पासून मालिका आणि मनोरंजनसृष्टीत काम करतेय. पण नाटक करण्याची संधी कधी मिळाली नाही. स्वतःच्या अभिनयाची प्रगल्भता ही नाटकानेच समजून येते. आता नाटक करावं म्हणून नाटक शोधत असतानाच २१७ पद्मिनी धाम साठी विचारणा झाली. रत्नाकर मतकरीच्या कथेवरील या नाटकांच वाचन जेव्हा माझ्यासोबत करण्यात आलं त्याच्या दुसऱ्याच क्षणी मी करतेय असं मी जाहीर केलं, असे अमृताने म्हटले.

या नाटकाचा दिग्दर्शक संकेत पाटील नवीन आहे तो संगीत दिग्दर्शक म्हणून अनेकांना माहिती असला तरी त्याची दिग्दर्शकाची बाजू किती दृढ आहे याचा मला प्रत्यय या नाटकाच्या निमित्ताने येतोय. एकांकिका करून मोठं होत असताना एकत्र येऊन एक मोठी कलाकृती उभं करण्यासाठीची धडपड जी माझ्यात होती ती मला या माझ्या या नाटकाच्या टीम मध्ये जाणवते. नाटकाचा शुभारंभ लवकरच होईल, आणि प्रेक्षकांना गूढ मनोरंजनाचा अनुभव आम्ही देऊ हे नक्कीच”, अशी प्रतिक्रिया अमृता पवारने दिली.

आणखी वाचा : “चाइल्ड अस्थमा, अ‍ॅलर्जीचे अटॅक अन्…”, निवेदिता सराफ यांनी सांगितली मुलाच्या बालपणीची अवस्था; म्हणाल्या “त्याला सोडून…”

दरम्यान अमृता पवारने ‘दुहेरी’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘ललित २०५’ या मालिकेतील ‘भैरवी’ हे पात्र साकारताना दिसली. या मालिकेनंतर तिने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत ‘जिजाऊ’ ही भूमिका साकारली. यासाठी तिने शिवकालीन युद्ध कलेचे आणि घोडेस्वारीचे चोख प्रशिक्षण घेतलं. या ऐतिहासिक भूमिकेनंतर अमृता ‘जिगरबाज’ या मालिकेत दिसली. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेतील तिचे पात्र आजही चर्चेत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress amruta pawar will make her professional theater debut 217 padmini dham drama nrp
Show comments