इन्स्टाग्राम रील्सवर सध्या अनेक जुनी गाणी व्हायरल होत आहेत आणि विशेष म्हणजे या सगळ्या गाण्यांना मराठीसह बॉलीवूड कलाकारांची भरभरून पसंती मिळत आहे. गेल्या काही दिवसांत शाहरुख-माधुरीचं “डोलना…” गाणं असो किंवा व्हायरल होणारी दाक्षिणात्य गाणी असो या प्रत्येक गाण्यांवर सामान्य माणसांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच डान्स व्हिडीओ बनवले आहेत. अशातच आता आणखी एक गाणं इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालतंय ते म्हणजे ‘नायक’ चित्रपटातील “रूखी सूखी रोटी…” हे गाणं सध्या सर्वत्र चर्चेत आलं आहे.
२००१ मध्ये ‘नायक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी आणि बॉलीवूडचे स्टार अभिनेते अनिल कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे आजही प्रेक्षक चाहते आहेत. यामधील “रूखी सूखी रोटी…” हे गाणं सर्वत्र विशेष लोकप्रिय आहे. कारण, राणी मुखर्जीने साकारलेल्या मंजिरी या खेडेगावातील सर्वसामान्य मुलीवर हे गाणं चित्रित झालेलं आहे. “रूखी सूखी रोटी तेरे हाथों से…हे रुकी सूखी रोटी तेरे हाथों से…खाके आया मजा बड़ा” असे या गाण्याचे बोल आहेत.
हेही वाचा : “गाण्यासाठी तब्बल ९९ टेक घेतले तरीही…”, सेटवर नाराज झालेले संजय लीला भन्साळी; रिचा चड्ढा म्हणाली, “शेवटी…”
‘नायक’ चित्रपटात राणी मुखर्जी अगदी हटके रुपात पाहायला मिळाली होती. परकर पोलकं, दोन वेण्या, डोक्यात भलामोठा गजरा असा तिचा पारंपरिक लूक होता. हाच लूक हुबेहूब रिक्रिएट करत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुलने “रूखी सूखी रोटी” गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रथमेश परबसह ती या गाण्यावर थिरकली आहे.
“बालो में गजरा, सुंदर मुखडा, आयी रे गांव की गोरी, मंजिरी नहीं अनघा” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. अनघाच्या या जबरदस्त डान्सवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा : Video : ना बॉलीवूड, ना साऊथ…; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा कोळी गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे अनघा घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने श्वेता हे नकारात्मक पात्र साकारलं होतं. याशिवाय नुकतीच ती ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेत झळकली होती.
© IE Online Media Services (P) Ltd