शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी, ८ फेब्रुवारीला गोळीबार करण्यात आला. फेसबुक लाईव्ह करताना अभिषेक घोसाळकर यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या गेल्या. यातच घोसाळकर यांचा मृत्यू झाला. घोसाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या धक्कादायक घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. आठवड्याभरात ही दुसरी गोळीबाराची घटना घडल्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधक राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणावर एका मराठी अभिनेत्रीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री, लेखिकेबरोबर घडला फसवणुकीचा प्रकार, प्रसंग सांगत म्हणाली, “मी याला बळी…”

अभिनेत्री अनघा अतुलने घोसाळकरांवरील गोळीबाराच्या घटनेनंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. ती म्हणाली, “आपल्या आजूबाजूला हे काय घडतंय? अशा बातम्या मला खूप अस्वस्थ करतात. आपण किती दुर्लक्ष करतोय?”

नेमकी घटना…

मॉरिसने काल, गुरुवारी अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्याच कार्यालयात एका कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. यानिमित्ताने ते फेसबुक लाईव्हवरून संवाद साधत होते. संवाद संपल्यानंतर सुरुवातीला मॉरिस उठून निघून गेला. त्यानंतर, अभिषेक घोसाळकर लाईव्हद्वारे संवाद साधत होते. “ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे”, असं अभिषेक घोसाळकर फेसबुक लाईव्हमध्ये बोलत होते. त्यांचा हा संवाद संपताच घोसाळकर जागेवरून उठले. त्याच क्षणी त्यांच्यावर गोळीबार झाला. लाईव्हमध्ये गोळ्या झाडल्याचा व लोकांच्या ओरड्याचा आवाज ऐकायला येत आहे. एवढंच नव्हे तर गोळीबार झाल्यानंतरही फेसबुक लाईव्ह पाऊणतास सुरुच होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress anagha atul reaction on abhishek ghosalkar firing case pps