अंकुश चौधरी मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अंकुशसह त्याची पत्नीही कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दीपा परब चौधरी हिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांना आपलसं केलं. झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या निमित्ताने तिने बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. या मालिकेमधील ती साकारत असलेली गृहिणीची भूमिका सध्या चर्चेत आहे.
दीपाने ‘तू चाल पुढं’मधील भूमिकेने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. इतर सेलिब्रिटींप्रमाणेच दीपाबाबतही अनेक गोष्टी जाणून घेण्यात तिचे चाहते उत्सुक असतात. आता तिनेच तिच्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत. लोकमत फिल्मशी बोलताना तिने भाजी घेण्यापासून ते आपल्या क्रश पर्यंत या विषयांवर भाष्य केलं आहे.
Video : “यात भाजपाची चूक, आप ने तर…” अनुपम खेर दिल्लीतील ‘त्या’ व्हिडीओमुळे ट्रोल
दीपाला विचारले की “भाजी आणायला जातेस का आणि बार्गेनिंग करतेस का?” त्यावर तिने उत्तर दिले हो “मला आवडतं भाजी आणायला मात्र आता मी जात नाही तसेच बार्गेनिंग पण मी करते,” पुढे “कोणाला प्रपोज केले आहे का?” असे विचारले तेव्हा ती म्हणाली, “नाही पण मला एका मुलाला करायचे होते. सचिन तेंडुलकर माझा क्रश होता त्याला मला प्रपोज करायचे होते. मात्र माझ्या नवऱ्याने एक कार्यक्रम केला होता तेव्हा सचिन आला होता तेव्हा त्याच्या बाजूला मी बसले होते.” अशी प्रतिक्रिया तिने दिली.
दीपाने मागे एका मुलाखतीत खुलासा केला होता की अभिनेत्री नसते तर सीए झाले असते असे तिने सांगितले होते. दीपा व अंकुशला एक लहान मुलगाही आहे. काही वर्ष दीपा कलाक्षेत्रापासून लांबच राहिली. फक्त घर व संसार सांभळणाऱ्या या अभिनेत्रीने पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे.