‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून आदित्य देसाईच्या पात्रातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर(Lalit Prabhakar). प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका खूप गाजली. या मालिकेबरोबरच त्यातील कलाकारांनादेखील मोठी प्रसिद्धी मिळाली. ललित प्रभाकरने या मालिकेनंतर चित्रपट आणि मालिकांमध्ये कामे केली आहेत. ‘चि. व चि.सौ.कां’, ‘आनंदी गोपाळ’, ‘झोंबिवली’, ‘हम्पी’, ‘मीडियम स्पायसी’, ‘स्माईल प्लीज’, ‘शांतीत क्रांती’, ‘तुझं तू माझं मी’, ‘टर्री’, ‘सनी’, ‘कलरफूल’, ‘नाच गं घुमा’, अशा अनेक चित्रपटांतून ललित प्रभाकरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याबरोबरच ललित अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनल्याचेदेखील पाहायला मिळाले आहे.

‘प्रेमास रंग यावे’ फेम अनुष्का बोऱ्हाडे ललित प्रभाकरविषयी नेमकं काय म्हणाली?

आता एका अभिनेत्रीने ललित प्रभाकर हा अभिनेता ‘क्रश’ असल्याचे म्हटले आहे.सन मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेतील अनुष्का बोऱ्हाडेने नुकताच ‘अल्ट्रा मराठी बझ’बरोबर संवाद साधला. त्यावेळी तिला सेलिब्रिटी क्रश कोण आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अनुष्काने रणदीप हुड्डा यांचे नाव घेतले. तिने पुढे म्हटले, “ते खूप गोड आहेत. मी आयुष्यात त्यांना कधी भेटेन की नाही ते माहीत नाही; पण मला रणदीप हुड्डा भरपूर आवडतात. मराठीमध्ये म्हणाल, तर ललित प्रभाकर आहेत. मला ते खूप आवडतात. मी त्यांना खूप फॉलो करते. नशिबानं झालंच त्यांना भेटणं, तर मी त्यांना नक्की सांगेन की, तुम्ही मला भरपूर आवडता.” त्याबरोबरच अनुष्काने आवडती अभिनेत्री म्हणून रेखा यांचे नाव घेतले.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”

हेही वाचा: Video: “माणसं माझ्या पाया पडतात आणि म्हणतात…”, अप्पांनी सांगितलं ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे त्यांना काय मिळालं?

दरम्यान, अनुष्का बोऱ्हाडे ही प्रेमास रंग यावे मालिकेत मेनकाची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. त्याबरोबरच सोशल मीडियावर तिचे मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

ललितच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच ‘मैसूर प्रेमकथा’मध्ये दिसणार आहे. त्यामध्ये सई ताम्हणकरसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याआधी सुद्धा दोघांनी एकत्र काम केले आहे. मीडियम स्पायसी, कलरफूल आणि ग्राऊंड झिरो या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. आता हा नवीन चित्रपट प्रेक्षकांना आवडणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader