छोट्या पडद्यावरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका अगदी सुपरहिट ठरली. या मालिकेमधील स्वीटू या पात्राने तर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. स्वीटू हे पात्र अभिनेत्री अन्विता फलटणकरने साकारलं. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारी अन्विता आपल्या चाहत्यांचं सतत मनोरंजन करताना दिसते. अन्विता याआधी तिच्या खासगी आयुष्याबाबत फारसं बोलताना दिसली नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिचं एक सिक्रेट सांगितलं आहे.

आणखी वाचा – Video : “माझ्या मुलीला शिव्या…” टीना दत्ताच्या आईने सुम्बुल तौकीरच्या वडिलांना सुनावलं, तोंडावर लाथ मारण्याचा दिला होता सल्ला

अन्विता सध्या मालिकांपासून दूर आहे. पण प्रेक्षक मात्र तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘इट्स मज्जा डॉट कॉम’ला अन्विताने नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी तिने तिचं बाथरुम सिक्रेट सांगितलं.

अन्विता म्हणाली, “तुम्हाल हे विचित्र वाटेल पण मला जेव्हा गहण विचार करायचा असतो तेव्हा मी बाथरूममध्ये असते. आंघोळ करतानाचा वेळ हा आपला असतो. अनेकदा माझं असं होतं की, मला कोणता निर्णय घ्यायचा असेल किंवा मला काही महत्त्वाचं ठरवायचं असेल तर ते मी बाथरूममध्ये ठरवते. हे माझ्या आता लक्षात आलं आहे.”

आणखी वाचा – Video : “मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ” किरण मानेंची ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एन्ट्री, स्पर्धकांना त्यांची जागा दाखवणार

बाथरूममध्येच निर्णय घेण्याची अन्विताची सवय आहे. तिने याबाबत आता अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. तो एकच वेळ आपला असतो असं तिचं म्हणणं आहे. अन्विताला स्वीटू या भूमिकेमुळे खरी ओळख मिळाली. आज तिचे सोशल मीडियावरही लाखो चाहते आहेत.

Story img Loader