मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अपूर्वा नेमळेकरच्या भावाचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर आता तिने तिची मोठी बहिण लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी पोस्ट केली आहे.

नुकतंच अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचा भाऊ आणि बहिणीबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना तिने तिच्या बहिणीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
आणखी वाचा : “तुला गमावणं ही सर्वात कठीण गोष्ट”, अपूर्वा नेमळेकरच्या भावाचे निधन; म्हणाली “तुझे हृदय…”

“मला माझे संपूर्ण जग उद्धवस्त होताना दिसत आहे. पण तरीही माझा प्रार्थनांवर विश्वास आहे. मला आशा आहे की, माझी मोठी बहीण लवकरच बरी होईल. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ”, असे अपूर्वाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

स्वामिनी नेमळेकर असे अपूर्वा नेमळेकरच्या मोठ्या बहिणीचे नाव आहे. दरम्यान अवघ्या दोन दिवसांपूर्वी अपूर्वाच्या भावाचे निधन झाले होते. तिने त्याच्याबरोबरचे काही फोटो पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहिली होती.

आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

“तुला गमावणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट आहे. जरी शारीरिकदृष्ट्या तू इथे नसला तरी तुझे हृदय इथेच असेल, ते माझ्याजवळ कायमच राहील. तू नेहमीच माझ्याबरोबर असशील. आपण पुन्हा कधीतरी नक्कीच भेटू आणि तिथे आपल्याला वेळ किंवा जागाही वेगळं करु शकत नाही”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले होते.

Story img Loader